कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

अनधिकृत मायनिंगमागे महसूलचा हात !

*🛑अनधिकृत मायनिंगमागे महसूलचा हात !*

*🛑परशुराम उपरकर यांचा आरोप: कार्यकर्त्यांना दम देण्याचा प्रयत्न*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१५*:-अनधिकृतपणे सुरू असलेल्या मायनिंग उत्खननाचे फोटो व वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे नंबर, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांनी पाठविलेले पुरावे संबंधित मायनिंगवाल्यांकडे कसे काय पोहचतात? त्यामुळेच मायनिंग यंत्रणेकडून आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना दम दिला जातो. त्यामुळे अनधिकृतपणे सुरू असलेल्या मायनिंग उत्खननामागे महसूल अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. अशाप्रकारचा दम दिल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही उपरकर यांनी यावेळी सावंतवाडी येथे मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.पडवे-माजगाव येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत मायनिंग उत्खनन झाले आहे. सदरचे मायनिंग डंपरमधून दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे डंपिग करून ठेवण्यात आले होते. ज्या ठिकाणी मायनिंग उत्खनन झाले, तो भाग इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने संबंधित यंत्रणेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. यामध्ये दोन्ही तालुक्यातील काम महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा आरोप उपरकर यांनी केला. कारण आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अनधिकृत मायनिंग उत्खननावेळचे फोटो पुरावे व गाड्यांचे नंबर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविल्यांनंतर हेच पुरावे मायनिंग यंत्रणेकडे लगेच पोहोचल्याने आपल्या कार्यकर्त्यांना मायनिंग यंत्रणेकडून दम दिला जात आहे. अशाप्रकारे दम दिल्यास गाठ’ आमच्याशी आहे, असा इशारा उपरकर यांनी दिला. या संदर्भात वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. यावेळी आशिष सुभेदार, शुभम सावंत आदी उपस्थित होते.कोकणचा विकास केला असे म्हणणाऱ्यांवर लोकसभा निवडणुकीत पैसे वाटण्याची वेळ आली, हे त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. मंत्री काळापासून ते रोजगार देणार, गारमेंट, अन्य प्रकल्प अशा फक्त घोषणा केल्या. परंतु, आजमितीपर्यंत काहीही आणले नाही. त्यांच्या नावाने निवडणुकीत पैसे वाटतानाचा व्हीडिओ आपल्याकडे असल्याचे सांगत उपरकर यांनी तो पत्रकार परिषदेत सादर केला. जिल्ह्यातील जनता खुळी नाही. त्यांनी जिल्ह्याचा कोणताही विकास केला नसल्याने त्यांना निवडून येण्यासाठी पैसे वाटण्याची वेळ आली, असा आरोप उपरकर यांनी केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!