ग्राहक न्यायालयाचा महावितरणला दणका
*🛑ग्राहक न्यायालयाचा महावितरणला दणका*
*🛑अवास्तव वीज बिल दुरुस्त करून द्या!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१५*:-जिल्हा ग्राहक न्यायालयाने महावितरणविरोधात दोन प्रकरणात दणका दिला असून एका प्रकरणात अवास्तव वीज बिल आकारल्याप्रकरणी ते दुरुस्त करून देण्यात यावे व तक्रारदाराला तक्रार अर्जाच्या खर्चापोटी २० हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या एका प्रकरणात वीज बिलाचा धनादेश वटलेला असतानाही बाऊन्स चार्जेस लावून बिल दिल्याने संबंधित तक्रारदारास व्याजासह रक्कम परत करण्यात यावी व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी दोन हजार व मानसिक त्रासापोटी पाच हजार रुपये महावितरणकडून देण्यात यावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.माणगाव येथील रहिवासी विष्णू वेंगुर्लेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगामध्ये महावितरण विरोधात सन २०२३ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महावितरणाने अचानक वेंगुर्लेकर यांना पत्र पाठवून मागील चार वर्षांपासून तुमचा मीटर फॉल्टी आहे आणि ३० हजार ६१० रुपये एवढ्या रकमचे सुधारित बिल त्यासोबत पाठविले होते. त्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महावितरणला अवास्तव वीजबिल दुरुस्त करून देण्यात यावे. थकबाकी हटविण्यात यावी व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी वेंगुर्लेकर यांना २० हजार रुपये देण्याचे आदेश पारित केले.अन्य एका प्रकरणामध्ये सावंतवाडी खासकीलवाडा येथील राजन तावडे यांनी त्यांचे वीजबिल धनादेशाद्वारे वेळेत भरणा करूनही महावितरणने त्यांच्या पुढील वीज बिलात चेक बाउन्स चार्जेस व जीएसटी चार्जेस लावून ८८५ रु. एवढी थकबाकी दाखवली. ही रक्कम तक्रारदार तावडे यांच्याकडून वसूलही करून घेतली. याबाबत तावडे यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर वीज बिलापोटी भरणा केला धनादेश वटलेला असूनही व त्याची रक्कम महावितरणच्या खात्यात जमा असूनही महावितरणने बेकायदेशीरपणे चेक बाऊन्स चार्जेस लावले असल्याचे जिल्हा आयोगाच्या सुनावणीत सिद्ध झाले.सुनावणीनंतर जिल्हा आयोगाने अंतिम आदेश पारित करून महावितरणने तक्रारदार तावडे यांना नऊ टक्के व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश दिले. तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये पाच हजार व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रुपये दोन हजार महावितरणकडून तक्रारदार तावडे यांना देण्याचे आदेशही पारित केले.या दोन्ही प्रकरणांची सुनावणी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अध्यक्षा इंदुमती मलुष्टे आणि सदस्य योगेश खाडिलकर आणि अर्पिता फणसळकर यांच्यासमोर घेण्यात येऊन दोन्ही निकाल देण्यात आले आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

