शिरशिंगे येथील श्री देवी पावणाई रवळनाथ देवस्थानचा उद्या ४ जाने. रोजी वार्षिक जत्रोत्सव
शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने साजरा करणार जत्रोत्सव… गावातील मानकऱ्यांनी घेतला निर्णय
कार्यकारी संपादक – आनंद धोंड
सावंतवाडी – तालुक्यातील शिरशिंगे हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गाव येथील नैसर्गिक सौंदर्य विलोभनीय आहे. या गावचे ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ, नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी या देवस्थानाची ख्याती आहे.
या देवस्थानचा उद्या दिनांक ०४ जानेवारी २०२१ रोजी वार्षिक जत्रोत्सव संपन्न होत आहे. त्यानिमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम नवस बोलणं, नवस फेडणे, ओटी भरणे रात्री ठीक बारा वाजता पालखी कार्यक्रम त्यानंतर आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनांच्या नियमांचे पालन करून जत्रोत्सवास उपस्थित रहावे. अशा प्रकारचे आवाहन शिरशिंगे येथील मानकरी, ग्रामस्थ तसेच श्री देवी पावणाई रवळनाथ स्थानिक देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.