आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बेपत्ता झालेला मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाठ सापडले

सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेचे सदस्य महेश रंगनाथ शिरसाट गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाले होते.या बेपत्ता झाल्यासंदर्भात सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची पत्नी श्रद्धा शिरसाट यांनी तक्रार दाखल केली होती.पोलीस आणि नातेवाईक महेश शिरसाट यांचा शोध घेत होते.आज सायंकाळी सातच्या सुमारास कुडाळ येथील महेश शिरसाठ हे आपल्या नातेवाईकांच्या दुकानात दाखल झाल्यावर नातेवाईकांनी त्याला आपल्या ताब्यात ठेवत घरच्यांना संपर्क केला.त्यानंतर घरच्यांनी कुडाळला जात त्याला ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!