आरोग्यकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

उद्या १३ मे ला कणकवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

उद्या १३ मे ला कणकवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

कणकवली, दि. १२: अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापुर आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ता. १३ मे ला कणकवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात अथायु हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांकडुन त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
यात हृदयविकार, हाडाचे विकार, गुडघे लिंगामेंट, कॅन्सर, किडनी विकार, पोस्टेट आदी व्याधी असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी तपासणी अंती शस्त्रक्रीया तसेच अधिक उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पुढील सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना या शिबीराचा लाभ घ्यायचा आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या शिबीराला संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी 8928736999 या नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!