कुडाळ येथे आजपासून अभिनय प्रशिक्षण शिबीर
*🛑कुडाळ येथे आजपासून अभिनय प्रशिक्षण शिबीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-११*:-साई जळवी फिल्मस आणि कोकण कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील हॉटेल स्पाईस कोकण (उद्यमनगर, हायवे) येथे ११ व १२ मे रोजी अभिनय व कॅमेरा फेसिंग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी चित्रपट अभिनेता संतोष जुवेकर उपस्थित राहणार आहे.सिंधुदुर्गात गेली अनेक वर्षे फिल्म लाईन प्रोड्युसर साईनाथ जळवी यांच्या माध्यमातून अनेक मराठी- हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. त्या चित्रपटांमधून सिंधुदुर्गातील अनेक कलाकारांना काम करण्याची संधीसुद्धा मिळत आहे. सध्या सिंधुदुर्गात चित्रित होणारे चित्रपट आणि मालिकांची संख्या पाहता, अनेक कलाकारांची गरज भासत असते.सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबीर चालणार आहे. या शिबिरात १० वर्षांपासून पुढे ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. दिग्दर्शक, फिल्म लाईन प्रोड्युसर जळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय प्रशिक्षण घेण्याची संधी शिबिरार्थीना मिळणार आहे. जळवी यांच्या माध्यमातून आतापर्यंत सिंधुदुर्गात ६१ मराठी आणि हिंदी चित्रपटांचे चित्रिकरण कोकणात करण्यात आले आहे. या चित्रपटांमधून सिंधुदुर्गातील पाच हजारपेक्षा जास्त कलाकारांना अभिनय करण्याची संधी मिळाली आहे. शिबिराचा लाभ जिल्हयातील अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छीणाऱ्या कलाकारांनी घ्यावा, असे आवाहन जळवी यांनी केले आहे. अनेक कलाकारांना जळवी यांनी कोकणात चित्रीकरण झालेल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिलीय. पैकी सिंधुदुर्गातील अनेक कलाकार चित्रपटसृष्टीत करिअर करीत आहेत. संतोष जुवेकर मार्गदर्शन करणार आहे. जळवींच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्याची संधी शिबिरार्थीना मिळणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

