शेर्पे येथे ठाकरे शिवसेना कार्यकर्त्याला मारहाण
*🛑शेर्पे येथे ठाकरे शिवसेना कार्यकर्त्याला मारहाण*
*🛑मतदानानंतरची घटना : बाळा जठार, दिलीप तळेकरसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०९*:-खासदार विनायक राऊत यांचा प्रचार केल्याबद्दल खारेपाटण-वेर्ले वरचीवाडी येथील शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते रामकृष्ण उर्फ बाळा बाळकृष्ण राऊत (५८) यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच त्यांच्या शर्टच्या खिशातील रोकड चोरली. या मारहाणीत रामकृष्ण हे जखमी झाले. हा प्रकार मतदान संपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी ६.१५ च्यां सुमारास शेर्पे येथे घडला. याप्रकरणी बाळा राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जि. प. माजी सभापती रवींद्र जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, नारायण शेट्ये यांच्यासह १० ते १५ जणांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सायंकाळी त्यांनी शेर्पे येथील रेशन दुकान बंद केले. त्यानंतर राऊत हे नातेवाईक संजय शेलार, भूषण सुतार, धनराज शेलार यांच्यासमवेत तुषार शेलार यांच्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले होते. त्याचवेळी दोन कारमधून रवींद्र जठार, दिलीप तळेकर, नारायण शेट्ये यांच्यासह १० ते १५ जण उतरले. त्यानंतर त्यांनी ‘तू राऊत साहेबांचा प्रचार करतो, तुला मस्ती आली आहे का?’ असे बोलत आपणाला थापटांनी व लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. यात आपल्या तोंडाला व शरिराच्या अन्य भागाला दुखापत झाली. आपल्या शर्टच्या खिशातील हजार ५० रुपयांची रक्कम चोरली ३ दाखल फिर्यादीनुसार, जठार, तळेकर, शेट्ये यांच्यासह १० ते १५ जणांवर भादंवि कलम ३७९, ३२४,३२३, ५०४, १४३, १४४, १४७,१४८, १४९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करीत आहेत. मारहाणीच्या घटनेनंतर राऊत यांना तातडीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, उपतालुकाप्रमुख महेश कोळसुलकर आदींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी व प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले होते. मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा सतीश सावंत यांनी दिला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

