कुडाळात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला
*🛑कुडाळात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला*
*🛑नागरिक आज घेणार मुख्याधिकाऱ्यांची भेट*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०९*:-कुडाळ शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यांवर, चौकाचौकात या भटक्या कुत्र्यांचा वावर दिसतो. या ठिकाणी फिरणारे कुत्रे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका सायकलस्वाराचा या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने तो जखमी झाल्याची घटना घडली. या कुत्र्यांचा बंदोबस्त कुडाळ नगर पंचायतीने करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यासाठी कुडाळ सुधार समिती व नागरिक ९ मे रोजी सकाळी १०.३० वाजता न. पं. मध्ये जाऊन मुख्याधिकारी यांची भेट घेणार आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. दोन वर्षांपूर्वी या कुत्र्यांनी शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांनी थैमान घातले होते.या अनुषंगाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली. त्यानंतर कुडाळ न. पं.ने लाखो रुपये खर्च करून या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा कार्यक्रम शहरात राबविला होता. नियोजन करून अशा कुत्र्यांची पकड मोहीम राबवून शहरातील सर्व प्रभागातील जवळपास सर्व कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते. भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊ नये म्हणून लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. परंतु अलिकडच्या काळात भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. निर्बिजीकरणानंतरही ही संख्या वाढली आहे.या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. कारण हे कुत्रे नागरिकांच्या भीतीने बाजूला हटत नाहीत, तर नागरिकांना त्यांच्यापासून सावध राहवे लागते. नाक्यानाक्यावर तसेच चायनीज ‘सेंटर, हॉटेल्स आदी ठिकाणी त्यांचा वावर असतो. रात्रीच्यावेळी हे कुत्रे रस्त्यावर आपले बस्तान मांडतात आणि दुचाकी, चारचाकी वाहनांचा पाठलाग करतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

