महिलेच्या पर्समधील दागिने, रोख रक्कम लंपास
*🛑महिलेच्या पर्समधील दागिने, रोख रक्कम लंपास*
*🛑एसटी प्रवासात चोरी : एक लाख ७३ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्याचा डल्ला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०७*:-कुडाळ बसस्थानकावरून विजयदुर्ग-सावंतवाडी बसने तळवडे येथे जाताना अज्ञाताने एका महिलेकडील पिशवी फाडून आतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स लंपास केला.सुप्रिया जाधव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आपण सोमवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास तळवडे येथे जाण्यासाठी कुडाळ बसस्थानकावर आले. आपल्यासोबत मुली, जावई व अन्य नातेवाईक होते. ११.४५ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकावर आलेल्या विजयदुर्ग-सावंतवाडी बसमध्ये आपण चढले. तिकीट काढण्यासाठी वाहक आपल्याकडे आला असता पर्स काढण्यासाठी आपण पिशवी उघडण्यास गेले, तर पिशवीचा वरचा भाग फाटलेला दिसला. आत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स होती. ती शोधली असता सापडली नाही. त्यानंतर आपण पर्स घरी विसरले नसेन ना, याची खात्री करण्यासाठी घरी गेले व खात्री केली असता पर्स घरी सापडली नाही. त्यानंतर आपण कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार,५० हजार रुपये किमतीचा २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १२ हजार ५०० रुपये किमतीचा पाच ग्रॅम वजनाचा आणखी एक सोन्याचा हार, ४५ हजार रुपये किमतीच्या १८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १२ हजार ५०० रुपये किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, २० हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे कानातले चार जोड, चांदीच्या दोन बांगड्या, २ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची लहान अंगठी व रोख ३० हजार रुपये मिळून १ लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. दरम्यान चोरीस गेलेल्या एकूण ५७ ग्रॅम वजनाच्या सोन्याची सध्याच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास ३ लाख ८४ हजार , रुपये किंमत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

