गर्दीअभावी सभा आटोपती घेण्याची वेळ !
*🛑 गर्दीअभावी सभा आटोपती घेण्याची वेळ !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०६*:-सावंतवाडीत रविवारी मंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेला गर्दी नसल्याने केसरकरांबद्दल शहरवासीयांची प्रचंड नाराजी दिसून आली. या केसरकरांच्या नाराजीमुळे नारायण राणे यांना लोकसभेत पराभवाला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट दिसून येत आहे, असा दावा उबाठा शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी शिवसेना कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. केसरकर यांनी रविवारी सावंतवाडी गांधी चौक येथे निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या सभेला गर्दी नसल्याने सभा सपशेल फेल ठरली आहे. सभेकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्याने सभा अवघ्या एक तासात आटोपती घ्यावी लागण्याची केविलवाणी वेळ आली आहे. केसरकर यांनी नारायण राणे यांची प्रचाराची धुरा संभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. केसरकर यांच्याविषयी तीव्र नाराजी सभेवेळी दिसून आली. केसरकर यांच्यामुळेच सावंतवाडी शहराचा विकास खुंटला आहे. केसरकर यांनी आपले घर,त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी शहरातून जाणारा मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग बाहेरून नेला. तसेच नियोजित संकेश्वर-रेडी महामार्गही आंबोलीपर्यत पूर्णत्वास येत असताना तो मार्ग शहरातून आणण्यास चालढकल करत आहेत. शहराची विकासकामे थांबण्यास केसरकरच जबाबदार आहेत असाही आरोप राऊळ यांनी केला. त्यांनी विकासाच्या वल्गना केल्या. प्रत्यक्षात ते काहीही करू शकत नाही. फक्त आमच्या नेत्यांवर टीका करण्याचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. पाणीबुडीसारखे मोठे विकास प्रकल्प गुजराताला पाठविले जातात. आमचे खासदार विनायक राऊत व नेते आदित्य ठाकरे यांच्यावर नाहक टीका केसरकर यांनी करू नये. राऊत यांच्या प्रयत्नामुळे मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला, हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे. केसरकर यांनी तालुक्यातील शाळांची दुरुस्ती, बालवाडी प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न सोडवून त्यांना नोकऱ्या दिल्या का, हे सांगावे, असे राऊळ म्हणाले. यावेळी शिवसेनचे पदाधिकारी राजू नाईक, चंद्रकांत कासार, रमेश गावकर, शैलेश गवंडळकर उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
