कोकणरत्नागिरीराजकीय

उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिवसेना शिकवू नये : नारायण राणे

*🛑उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिवसेना शिकवू नये : नारायण राणे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴रत्नागिरी, दि-०४*:-शिवसेनेत मी ३९ वर्षे काम केले आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना स्थापन केली, तेव्हा मी सोळा-सत्रा वर्षांचा होतो. शिवसेनेची सारी जडणघडण मला माहिती आहे. त्यामुळे शिवसेना काय आहे, ही गोष्ट मला उद्धव ठाकरेंनी शिकवू नये, अशा राब्यात उमेदवार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला.राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी – माणूस आणि हिंदुत्वासाठी आपले आयुष्य वेचले. मात्र उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडून मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले. उद्धव ठाकरे यांचा आता तोल गेला असून – ते आपल्या भाषणात काहीही बरळत आहेत. केवळ शिव्या देणे एवढा एकच कार्यक्रम ते,आपल्या भाषणातून पार पाडत आहेत. असे हे शिवराळ भाषा वापरणारे आपली प्रगती नाही करू शकत. उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांनी दहा वर्षात कोणते विकासकाम केले, हे त्यांनी दाखवावे. त्यांनी एखादा प्रकल्प आणला का, असा प्रश्न विचारला गेला तर तर त्याचे उत्तर नाही असे आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर सातत्याने टीका करणे एवढेच काम ठाकरे आणि त्यांनी केले आहे. विकासकामांच्या बाबतीत मोदी सरकारने आज मोठा पल्ला गाठला आहे. सभेला जमलेल्या लोकांपैकी जवळपास ६० ते ६५ टक्के लोक मोदी सरकारचे लाभार्थी असल्याचे प्रतिपादन राणेंनी केले.राणे यांनी मनोगताच्या सुरुवातीला त्यांच्या प्रचारार्थ आलेले अमित शाह यांचे गुणगान केले. शाह हे आपले प्रेरणास्थान असल्याचे राणे यांनी सांगितले. तसेच शाह यांनी आपल्यासाठी समा आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. कोकणचा कैलिफोर्निया करण्याचे स्वप्न तुम्हा सर्वांचे आहे. परंतु मी असा विकास करेन की कॅलिफोर्नियावासीयांनी उद्या म्हटले पाहिजे की, आम्हाला कोकणसारखी प्रगती हवी आहे, असे राणे म्हणाले.
*विनायक राऊतांचे डिपॉझिट जप्त करा : नारायण राणे*
अमित शाह यांच्या उपस्थितीत राणेंनी आज वेगळ्याच आवेशात भाषण केले. भाषणाच्या समारोपावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विनायक राऊत यांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन केले. राऊत निवडणुकीत असे पडले पाहिजेत की परत उठता नयेत, असे राणे म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!