कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे आमचे मताधिक्य वाढणार !

*🛑उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे आमचे मताधिक्य वाढणार !*

*🛑नीतेश राणेंचा टोला : एक लाख मतदान वाढणार!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०३*:-उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत येऊन त्यांच्या स्वभावाप्रमाणे जाहीर सभा घ्यावी. त्यांनी नारायण राणे आणि आम्हाला, भाजप नेत्यांना शिव्या द्याव्यात. मग आमचे एक लाख मतदान वाढणार हे नक्की आहे. यापूर्वी सुद्धा तसेच केले होते. माझ्या विधानसभेला तेव्हा ५० हजार मते वाढली होती. ठाकरेंनी आम्हाला शिव्या दिल्याने जनतेने रागाने आम्हाला मते दिली होती. यावेळी सुद्धा तसेच होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेण्यासाठी यावे. हवं तर मी त्यांना हेलिकॉप्टर करून देतो, रेल्वेचे तिकीट काढून देतो, अशी उपरोधिक टीका आमदार नीतेश राणे यांनी केली.येथे पत्रकारांशी बोलताना श्री. राणे म्हणाले, उद्धव ठाकरे गद्दार व बेईमान माणूस आहेत. ज्यांनी आपल्या वडिलांना सोडले नाही. रक्ताच्या भावाशी बेईमानी केली. स्व. बाळासाहेबांच्या विचारांशी, त्यांच्या शिवसैनिकांशी बेईमानी केली. मराठी माणसासोबत बेईमानी केली. त्यांचा खरा चेहरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. एका तोंडाने शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचे म्हणून सांगायचे आणि घरातील माणूस मुख्यमंत्री होत नसेल, तर आपल्याच शिवसैनिकांना मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ द्यायचे नाही, असे कृत्य उद्धव ठाकरे यांनी केले व त्यांचा खरा चेहरा श्री. फडणवीस यांनी आणला. महाराष्ट्रासमोर प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहणे, ही संजय यांची रोजची सवय झाली निवडणूक आयोगाला सल्ले राऊत आहे. आणि त्यांच्यावर आरोप करून उगाचच अकलेचे तारे ते तोडत आहेत. मतदार कधी मतदान करतात, हे ज्याला माहीत नाही, त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. मतदान कसं असतं, हे आधी शिकून घेतलं पाहिजे. फडणवीस यांना फुसका बार बोलण्याचा अधिकार चायनीज फटाका जो वाजत नाही त्या संजय राऊत यांना नाही. श्री. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेबाबत काल जे वक्तव्य केले, त्यावरून उद्धव किती स्वार्थी आहेत, हे दिसून येते. त्यांना शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काही देणं घेणं नाही.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत वातावरण आमच्यासाठी सकारात्मक आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. कोण कोणाच्या हाताखालची बाहुली आहे, हे सिल्वर ओकवर हुजरेगिरी करणाऱ्यांनी सांगू नये. सिल्वर ओक व मातोश्रीची बाहुली कोण, हे महाराष्ट्राला कळले असल्याचेही श्री. राणे म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!