कोकणमहाराष्ट्रराजकीय

कोकण कोणाला गिळंकृत करायला देणार नाही !

*🛑 कोकण कोणाला गिळंकृत करायला देणार नाही !*

*🛑 खासदार विनायक राऊत यांची टीका*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴शिरोडा, दि-०३*:-कोकण ही आमची देवभूमी आहे. ती कोणाला गिळंकृत करायला देणार नाही. कोकण किनारपट्टीवरील तब्बल सहा लाख हेक्टर जमीन सिडको आणि परप्रांतीयांच्या ताब्यात देण्यासंदर्भात राज्य शासनाने ४ मार्च २०२४ रोजी जी.आर. काढला आहे. भविष्यात या गावातील ग्रामपंचायतींना दुय्यम स्थान दिले जाणार. वेंगुर्ला तालुक्यातील ७० गावच्या ग्रामपंचायती दुय्यम करून त्यावर सिडको प्राधिकरणाचा अंमल राहील, असा संभाव्य धोका निदर्शनास आणून देऊन केवळ कोकण किनारपट्टीवर यांचा डोळा का? ठाणे, पुणे, नागपूर भागात हे का नाही, असा सवाल केला. कोकणचे शत्रू म्हणून यांना हद्दपार करा, असे प्रतिपादन रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी येथे केले. येथील देवी माऊली शतचंडी स्मारक सभागृहात मंगळवारी सायंकाळी मविआच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.खासदार राऊत यांनी आपल्या भाषणातून केंद्रीयमंत्री नारायण राणे तसेच राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, रेडी पोर्टमधील नारायण राणे यांची दलाली कमी केली. बंदरातील लोडिंग-जनलोडिंगचे काम या भागातील युवकांना देण्यास भाग पाडले. यांची टक्केवारी कमी झाली आहे. शिरोडा वेळागर किनाऱ्यावर ताज ग्रुप वा आणखी कोणाचे हॉटेल आणा. परंतु, सर्व्हे नंबर ३९ पूर्णपणे मुक्त केला पाहिजे, अशी मागणी करत आता आपणाला सावध राहिले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे, साक्षी वंजारी, ‘आप’चे विवेक ताम्हणकर, इर्शाद शेख, जयप्रकाश चमणकर, जान्हवी सावंत आदींची भाषणे झाली. त्यांनी मविआचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सभास्थांनी शिरोडा सरपंच लतिका रेडकर, माजी सभापती बाळू परब, जगन्नाथ डोंगरे, अजिंक्य गावडे, दोडामार्गचे नगरसेवक चंदन गावकर आदी होते. वेंगुर्ला तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब यांनी उपस्थितांतून पेटती मशाल आणली आणि उमेदवार राऊत यांच्या स्वाधीन केली. बाळू परब यांनी सूत्रसंचालन तर नामदेव राणे यांनी आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!