कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

भातपीक विमा भरपाई न मिळाल्यास १३ रोजी आंदोलन

*🛑भातपीक विमा भरपाई न मिळाल्यास १३ रोजी आंदोलन*

*🛑छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचा शासनाला इशारा : तहसीलदारांना निवेदन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-०३*:-पंतप्रधान फसल विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील भातपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही विमा भरपाईपासून वंचित राहवे लागले आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसात नुकसान भरपाई देण्याचे, आश्वासन देऊन आज दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसात ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास १३ मे रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. जिल्ह्यातील भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. युनायटेड विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी याचे रितसर पंचनामेही केले होते. याला ६ ते ७ महिने झाले तरी पिक विम्यापोटी मिळणारी नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. या संदर्भात ७ मार्च रोजी शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी जिल्हा विमा प्रतिनिधी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यां शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेत ठोस निर्णय न झाल्याने युनायटेड विमा कंपनीचे राज्य समन्वय यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी आठ दिवसात नुकसान भरपाई देण्याचे मान्य करत उपोषण मागे घेण्याचे विनंती शेतकऱ्यांना केली होती. या घटनेला आता दोन महिने उलटले असून शेतकरऱ्यांना अद्यापही विमा नुकसान भरपाईची प्रतीक्षाच आहे. विमा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास १३ मे रोजी वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर रमाकांत परब, उत्तम नाईक, शिवराम सावंत, आग्नेल फर्नांडिस, प्रभाकर गावडे, गुलाबी सावंत, तातोबा परब, राजन आरोसकर, प्रदीप सावंत, घनःश्याम शेटकर, कृष्णा राय, विठ्ठल आरोसकर, उमेश शेटकर, राजन चव्हाण, हनुमान वराडकर, जगदिश परब, रविकिरण परब, नंदगिरी परब, मुकुंद नाईक, वासुदेव परब, निवृत्ती परब, यशवंत तेली यांच्या सह्या आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!