आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडीत महायुतीची ‘महारॅली ‘

🛑 सौ. नीलमताई राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ..

🛑 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०३:- लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात गुरुवारी सायंकाळी भव्य रॅली काढण्यात आली. सौ. नीलम ताई राणे यांच्या हस्ते तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. महायुतीच्या प्रचार कार्यालयापासून सुरू करण्यात आलेली ही रॅली संपूर्ण सावंतवाडी शहरात काढण्यात आली. या महा रॅलीत शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते महिला व नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत ना. नारायण राणे यांच्या विजयाचा संकल्प केला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे हा कोकणचा स्वाभिमान आहे. केंद्रातील मंत्रिपदाच्या माध्यमातून ते कोकणचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कोकणच्या विकासासाठी त्यांचे हे मंत्रीपद कायम राहणे आवश्यक असून या निवडणुकीत कोकणची जनता त्यांना निश्चित विजयी करेल. आज सावंतवाडीकर नागरिक ना. नारायण राणे यांच्या प्रेमापोटी उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत नारायण राणे यांचा रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

माजी खासदार निलेश राणे यांच्यासह सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख ॲड नीता सावंत, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर,मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, मनोज नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश गवस, गुणाजी गावडे, तालुकाध्यक्ष उदय भोसले, संध्या तेरसे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, शिवसेनेच्या उपसंघटक अर्चना पांगम, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, शिवसेना शहर प्रमुख तसा माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, भाजपा शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, सौ. मोहिनी मडगावकर,माजी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, नासीर शेख, सुरेंद्र बांदेकर, गुरुदास मठकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, मंदार नार्वेकर, संतोष गांवस, केतन आजगावकर, राघू चितारी, अशोक पवार, निशिकांत तोरस्कर, बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, तेजस माने, सुमित वाडकर, हेमंत बांदेकर, देव्या सुर्याजी, अर्चित पोकळे, प्रतिक बांदेकर, नंदू शिरोडकर, परीक्षित मांजरेकर, ॲड. राजू कासकर, श्रीपाद सावंत, बंडया केरकर, रवि नाईक, विनोद सावंत यांच्यासह सावंतवाडी शहरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीच्या सुरुवातीला असलेल्या ढोल पथकामुळे या रॅलीला विजयी रॅलीचे स्वरूप प्राप्त झाले होते. रॅलीत सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. ‘ नारायण राणे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, ‘ खणखणीत नाणे, नारायण राणे ‘ अबकी बार चारसो पार ‘ फिर एक बार मोदी सरकार, ‘ भारत माता की जय, अशा घोषणांनी सावंतवाडी शहर परिसर दुमदुमून गेला होता. सावंतवाडी शहरात रॅली जात असताना नागरिक उत्स्फूर्तपणे या रॅलीत सहभागी होत होते. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करीत होते. एकंदरीतच या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित असून त्यांच्या विजयात सावंतवाडी शहराचा वाटा मोलाचा असेल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!