सावंतवाडीत महिला शिवसैनिकांचा आज मेळावा
*🛑सावंतवाडीत महिला शिवसैनिकांचा आज मेळावा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०२*:-सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महिला मेळावा २ मे रोजी येथील वैश्य भवन येथे दुपारी ३.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. सुमारे एक हजार महिला उपस्थित राहणार असून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या सौभाग्यवती नीलम राणे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर महिलांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अॅड. निता कविटकर व जिल्हाप्रमुख अशोक दळवी व माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या मतदारसंघातून दीड लाख महिला महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मतदान करणार आहेत. या भागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झालीत, त्याची पोचपावती जनता मतपेटीतून देणार असल्याचे दळवी म्हणाले.लोकसभा मतदारसंघात महिलांची संख्या जास्त असून महिला दीड लाखांहून अधिकच मताधिक्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामागे उभे करणारे असल्याचा विश्वास अॅड. निता कविटकर यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, मतदारसंघात मोठा पाठिंबा महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मिळत आहे. पाचही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने कार्यरत आहेत. ग्रामीण भागासह शहरातून सर्वाधिक लीड हे राणेंचे असेल. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे म्हणून जनता आमच्यासोबत राहील. त्याची पोचपावती राणेंना मिळणाऱ्या मताधिक्यातून असेल, असे मत व्यक्त केले. अॅड. नीता कविटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, भाई देऊलकर, एकनाथ नारोजी, पप्पू सावंत, महिला विभाग प्रमुख स्नेहा कुडतरकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

