चार आठवड्यांनंतर कालव्याचे पाणी सोडले मान्सूनपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन
*🛑चार आठवड्यांनंतर कालव्याचे पाणी सोडले मान्सूनपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-०२*:-गेले चार आठवडे बंद ठेवण्यात आलेल्या तिलारी धरणाच्या बांदा शाखा कालव्यातून मंगळवारपासून पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या उजव्या कालव्याच्या २१ किलोमीटरवरील नेतर्डे गेट येथून कालव्यात पाणी सोडले आहे. येत्या मान्सूनपर्यंत शेती बागायतीसाठी हे पाणी देण्याचे पाटबंधारे खात्याचे नियोजन आहे. त्यामुळे नेतर्डे, बांदा, वाफोली, विलबडे, सरमळे, ओटवणे, इन्सुली, निगुडे रोणापाल या नऊ गावात उन्हाळ्याच्या अखेरीस जाणवणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. त्यामुळे या भागात समाधान व्यक्त होत आहे. तिलारी धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे तसेच मान्सूनच्या अनिश्चित काळामुळे ५ एप्रिलपासून गेले चार आठवडे पाणी बंद ठेवण्यात आले होते. यावर्षी तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी वेळेत सोडल्यामुळे ओटवणेसह सरमळे, विलवडे इन्सुली, निगुडे, रोणापाल गावातील शेतकरी बागायतदारांसह ग्रामस्थांमध्ये समाधान होते. पाणी कालव्याला आल्यामुळे कालव्याच्या परिसरातील पाण्याचे झरे प्रवाहीत होऊन पिण्यासह शेतविहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे या भागात दरवर्षी भासणारी पाणीटंचाई आपोआप दूर झाली. परंतु हे पाणी ऐन हंगामातच बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांसह बागायतदारांचेही नुकसान झाले. त्यामुळे या भागात नाराजी होती.दरम्यान, वाफोली, विलवडे, सरमळे, ओटवणे या चार गावातील तिलारी कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती असल्याने कालव्यातील पाणी वाया गेले. शिवाय या अतिरिक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानही झाले. शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची मुळे कुजून मोठे नुकसान झाले. या गळतीच्या पाण्यामुळे कालव्या लगतच्या शेत जमिनीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामध्ये तण वाढून पावसाळ्यासह उन्हाळ्यातही शेती पडीक राहते. तिलारी प्रकल्पाच्या बांदा शाखा कालव्याच्या २१ किलोमीटरवरील नेतर्डे गेट येथून वाफोली, विलवडे, सरमळे हे २० कि.मी. अंतर तर पुढे ओटवणे, इन्सुली, निगुडे असा १३ कि.मी.चा प्रवास करीत हे पाणी चार दिवसात रोणापाल गावात पोहोचणार आहे. याबाबत तिलारी पाटबंधारे खात्याचे उपभियंता संतोष कविटकर यांच्याशी संपर्क साधला असता, तिलारी प्रकल्पाच्या बांदा शाखा कालव्याच्या नेतर्डे गेट येथून ३००० लिटर प्रतिसेकंद या गतीने कालव्यात पाणी सोडले जात असून येत्या पावसाळ्यापर्यंत हे पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

