आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सासोलीत एक्सोन ओरिजीन च्या इंजिनीयरला मारहाण करणारे सहा अज्ञात अद्याप मोकळे का?

🛑 कायदा हातात घेऊन भर रस्त्यात अशी मारहाण होत असेल तर सिंधुदुर्गातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न

🛑 एखाद्या जमिनीची विक्री चुकीच्या पद्धतीने झाली असेल तर न्यायालयीन लढा लढावा कायदा हातात घेणाऱ्यांना पोलिसांनी अभय देऊ नये

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि-३०:- सासोली गावातील शेकडो एकर जमीन सामायिक क्षेत्रातील काही भागदारांना काही एजंटांनी हाताशी धरून एक्सोन ओरिजिन कंपनीला विकली असेल व त्या कंपनीने रितसर खरेदीखत करून ती जमीन सातबारा सदरी आपल्या नावावर करून घेतली असेल तर जमीन विकत घेणारे दोषी कसे काय ठरू शकतात? जमीन विकत घेईपर्यंत सामायिक क्षेत्रातील इतर भागधार कुठे होते? हा संशोधनाचा विषय आहे, शिवाय सासोली गावामध्ये त्या कंपनीला कोणी आणले या मागचे कमिशन खाणारे दलाल कोण याचाही शोध संबंधित गावातील ग्रामस्थांनी घेतला पाहिजे. जमिनी परत मिळण्यासाठी कायदेशीर लढाई लढायची सोडून जर कोण कायदा हातात घेऊन पोट पाण्यासाठी आलेल्या एखाद्या इसमाला मारहाण करत असतील तर सिंधुदुर्गच्या दृष्टीने ही भयावह बाब आहे.

या घटनेचे समर्थन कोणीही करू शकत नाही जर एखादा जमिनीचा व्यवहार चुकीच्या पद्धतीने केला गेला असेल तर त्याला न्यायालयात दात मागता येते त्यासाठी कायदा हातात घेण्याची गरज नाही, त्यामुळे त्या इंजिनीयरला ज्या कोणी व्यक्तीने अमानुषपणे मारहाण केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, तरच सिंधुदुर्गातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आहे असे म्हटले जाईल.

भारत देशात सध्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे, मिळेल तिथे पोट भरण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार जात असतात त्यात त्यांचा कोणताही दोष नसतो असे असताना एखाद्या सुशिक्षित बेरोजगार इंजिनीयरला अशाप्रकारे तो कंपनीचे काम करतो म्हणून रस्त्यात गाठून लाठ्या-काठ्याने हॉकी स्टिकने मारहाण करणे ही गंभीर बाब आहे त्यामुळे संबंधित मारहाण करणारी माणसं कोण याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.

या घटनेत म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय …कळणे मायणीच्या आंदोलनाच्या वेळी असाच एक सिक्युरिटी गार्ड मारला गेला, तो कसा मेला? कधी मेला? हा संशोधनाचा विषय होता, मात्र तरीही अनेक जणांना त्या प्रकरणात खुणाच्या गुन्ह्यात अटक करून अनेक दिवस पोलीस कोठडी व जेलमध्ये काढावे लागले, त्याची पुनरावृत्ती सासोली मध्ये होऊ नये एवढीच आमची रास्ता पेक्षा आहे.

बाकी ज्याने कोणी त्या कंपनीला जागा विकली व जे कोण आता या आंदोलनात उतरले आहेत त्यांनी या मागचा बोलवता धनी कोण? ती कंपनी आमच्या गावात कशी आली? त्यांना सामायिक क्षेत्रातील जागा कोणी विकली? त्यांना किती पैसे मिळाले? त्यांच्या दलालना किती पैसे मिळाले? याचा अभ्यास करून कायदेशीर बाबींची पूर्तता करून याविरुद्ध लढा देणे गरजेचे आहे, कायदा हातात घेऊन एखाद्या निरपराध माणसाला रस्त्यात गाठून जर कोण अमानुष पणे मारहाण करत असेल व पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालत असेल तर सिंधुदुर्गात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत आहे का याचा शोध घ्यावा लागेल,या ठिकाणी ती कंपनी कुठून आली त्यांचे अधिकारी कोण आहेत याबाबत आम्हाला काही देणे घेणे नाही मात्र त्या कंपनीत काम करणारे कामगार हे आपल्या पोटापाण्यासाठीच काम करतात जसे आपले स्थानिक रहिवासी पोटपाण्यासाठी इतर राज्यात जातात तसेच ते आपल्या पोटपाण्यासाठी सिंधुर्गात आलेले आहेत त्यांना आज्ञास्थळी गाठून अशा प्रकारची बेदम मारहाण होत असेल तर ती बाप 100% चुकीची आहे ,त्याचे समर्थन आम्ही कधीही करणार नाही त्यामुळे पोलिसांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन मारहाण करणारे ते कोण आहेत? जखमी इंजिनियरने त्यांना ओळखले त्यातील दोघांची नावे सांगितली ते खरे आहेत का? व ती नावे खरी असतील तर त्यांना अभय का दिले गेले? हा आमचा पोलिसांना सवाल आहे .पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणात सखोल तपास करून अशा प्रकारची दहशद माजविणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करावी अशी आमची रास्त मागणी आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!