केसरकरांकडून खोटी आश्वासने देऊन दिशाभूल !
*🛑केसरकरांकडून खोटी आश्वासने देऊन दिशाभूल !*
*🛑दोडामार्ग येथे पत्रकार परिषदेत बबन साळगावकर यांची टीका*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२९*:-दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील जनतेला फक्त स्वप्नांची आश्वासने देऊन येथील जनतेची थट्टा केली आहे. विकासकामांच्या आश्वासनावर स्वप्नांचा बाजार मांडला आहे, दोडामार्ग तालुक्याचा विकास करण्यास केसरकर अपयशी ठरले, अशी टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.येथील उबाठा शिवसेनेच्या तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत साळगावकर बोलत होते. त्यांच्यासोबत उबाठा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, संदीप गवस, चंदन गावकर, उल्हास नाईक,सुदेश तुळसकर, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, सागर नाईक, दशरथ मोरजकर, गौतम महाले, गुंडू जाधव, विजय जाधव, संदेश गवस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी साळगावकर पुढे म्हणाले की, आपल्या मतदार संघातील दोडामार्ग तालुक्याचा विकास करण्यास केसरकर अपयशी ठरले. त्यांनी फक्त लोकांना स्वप्नांचा बाजार दाखवत लोकांची दिशाभूल केली. त्यांना निवडून आणण्यासाठी स्वतः मी सावंतवाडीतून त्यांना मदत केली. पण, त्यांनी कोकणच्या हितासाठी नव्हे तर आपल्या स्वतःच्या हितासाठी पक्ष बदलले. एवढा मोठा कोरोनासारखा आजार सर्वत्र पसरला तर केसरकर मतदारसंघात फिरकले पण नाही. अशा या स्वप्नाच्या जादूगारवर अजिबात विश्वास ठेऊ नका. आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असे त्यांनी येथील जनतेला आवाहन देखील केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

