राणेंनी बेरोजगारीवर बोलणे हास्यापद !
*🛑राणेंनी बेरोजगारीवर बोलणे हास्यापद !*
*🛑ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२९*:-रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या असल्याचे केंद्रीय सुक्ष्म व लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी राजापूर येथील जाहीर सभेत म्हटले होते. साडेतीन वर्षे केंद्रीय मंत्री पदाचा वापर रोजगार निर्मितीसाठी न करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बेरोजगारीवर बोलणे हास्यास्पद आहे. याठिकाणी रोजगार निर्माण न करणे हे सत्ताधाऱ्यांचेच पाप असल्याची टीका ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली. परुळेकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले राजापूर येथे महायुतीच्या जाहीर प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कोकणात बेकारी जास्त असल्याचे उद्गार काढले. मुळात या ठिकाणी बेरोजगारी येण्यास सत्ताधारीस कारणीभूत असून केंद्रीय मंत्री राणे यांच्याकडे सुक्ष्म, मध्यम, लघु खात्ते असतानाही या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभारू शकले नाहीत, दुसरीकडे सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना या ठिकाणी मंजूर असलेला रेल्वेचा कारशेड प्रकल्प दुसरीकडे गेला. या सर्वाला सत्ताधारीत जबाबदार असून राणेंनी बेरोजगारीवर बोलणे हे हास्यास्पद आहे. ते म्हणाले, येथील स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री केसरकर हे निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन फेकण्यास कुप्रसिद्ध आहेत. येथील चार लाख मुलांना जर्मनी भाषा शिकवण्याचे आश्वासन फेकत आहेत. जर्मनीत या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन ते देत आहेत. परंतु निवडणुका संपल्या की, रात गयी बात गयी, कुठली जर्मनी आणि कुठली ऑस्ट्रेलिया असेच त्यांचे वागणे असणार आहे. त्यामुळे कितीही गाजर दाखवले तरी इथली जनता सुज्ञ असून ती योग्य ते काम करणार. देशापुढे महागाई हा गंभीर विषय असून त्यावर न बोलता तो बाजूला सारून भावनिक आव्हान जनतेत करण्याचा प्रयत्न महायुतीचे पदाधिकारी करीत आहेत, याला जनता बळी पडणार नसल्याचेही ते म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

