उदय सामंत म्हणजे माझा विश्वास !
*🛑उदय सामंत म्हणजे माझा विश्वास !*
*🛑नारायण राणे यांचे प्रतिपादन : रत्नागिरी-पटवर्धनवाडी येथे महायुतीची प्रचार सभा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴रत्नागिरी, दि-२९*:-सामंत कुटुंबियांशी आमचे चांगले संबंध आहेत. मी एकटा नाही. मला येथे धोका वाटत नाही. उदय म्हणजे माझा विश्वास आहे. मी अविश्वास ठेवून काम करीत नाही. त्यामुळे रत्नागिरीतून जास्तीत-जास्त मताधिक्य मिळणार आहे. उदय सामंत हे रत्नागिरीचा विकास करीत आहेत. त्यांच्या जोडीला मोदी सरकारच्या माध्यमातून रत्नागिरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री, महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केले. रविवारी सायंकाळी उद्यमनगर, पटवर्धनवाडी येथील लोकमान्य टिळक सभागृहात शहर प्रभाग क्र. २, ३, ४ मधील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी मंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, माजी नगराध्यक्षा राजेश्वरी शेट्ये, भाजप महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी, माजी उपनगराध्यक्ष सुदेश मयेकर, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, राजन फाळके, सुदेश मयेकर,माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, भाजयुमोचे सरचिटणीस प्रवीण देसाई, कौशल्या शेट्ये, पल्लवी पाटील, नितीन गांगण, प्रसाद शेट्ये, प्रसाद बाष्टे आदी उपस्थित होते.राणे म्हणाले, कोरोना काळात व्यवसाय, दुकाने, कारखाने बंद पडले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांना पुन्हा कामावर रुजू होण्याकरिता प्रयत्न केले. माझ्या खात्याला साडेपाच लक्ष कोटी रुपयांचा निधी दिला. त्यातून कारखाने उभे राहिले व कामगारांना रोजगार मिळाला. मोदी जे सांगतात ते पूर्ण करतातच. मंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरीचा ‘विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व नारायण राणे यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. शहरालगतच्या उद्यमनगर येथे डिफेन्स क्लस्टर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी मिळत आहे. आगामी निवडणुकीत राणे यांना विजयी करायचे आहे आणि त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळेल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

