कणकवली परिसरात तिसऱ्या दिवशीही चोरी
*🛑कणकवली परिसरात तिसऱ्या दिवशीही चोरी*
*🛑कलमठ-गुरववाडी येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२५*:-कणकवली शहरापासून जवळच असलेल्या कलमठ-गुरववाडी येथील रुपेश मारुती जाधव (४१) यांच्या घरात घुसून चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्तव्यस्त करून घरासमोर लावलेली ८४ हजार रुपये किमतीची टीव्हीएस स्पोर्ट्स दुचाकी चोरून नेली. ही घटना बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आली. चोरीप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कणकवली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्येही घबराट पसरली आहे.घरात माणसे असतानाही चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. रुपेश जाधव व त्यांचा भाऊ आपापल्या बेडरुममध्ये झोपले असताना चोरट्यांनी बेडरुमला बाहेरून कडी लावली. त्यानंतर चोरट्यांनी घरातील खुंटीला लावलेली चावी घेऊन दुचाकी चोरली. यावेळी तेथील आणखी एक दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.मंगळवारी शहरातील विद्यानगर येथील बंद असलेला फ्लॅट चोरट्यांनी फोडून १५ हजार रुपयांची रोकड व ६० हजार रुपयांची सोन्याची चेन असा ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कणकवली परिसरातच पुन्हा चोरी झाली आहे. चोरटे सक्रीय झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

