मी कोणत्याही जागेत अतिक्रमण केलेले नाही व माझ्यावर कोणीही बिनबुडाचे आरोप करू नयेत; गणपत पाटील

▪️हप्ते घेणाऱ्यांनी तर मुळीच खोटे आरोप करू नयेत; पाटील यांचे स्पष्टीकरण

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : आंंबोली

🎴आंंबोली,दि.३१: येथील त्या जागेसंदर्भात गेली ३ वर्षे न्यायालयात सदरील खटला चालू आहे. गावातील लोकांना ब्लैकमेल करून इतरांच्या जमिनी हिसकावून घ्यायचे दिवस गेले. आपल्या जमिनी मुंबई-पुणे येथील लोकांना विकून खाल्ल्या व गरीब शेतकऱ्यांना असा नाहक त्रास देऊन त्यांच्या जमिनी बाळकावण्याचा प्रयत्न ह्या भूमाफियांनी करू नये. गावामध्ये दहशत कोण निर्माण करतय हे गावातील मायबाप जनता बगत आहे. मोठ-मोठी हॉटेल्स इमारतीसाठी आपल्या जागा विकून आता आमच्या जमिनीवर डोळा ठेवू नये. ०/९३ सर्वे नंबर मधील जर गणपत पाटील यांचे घर व शेती दिसत असेल तर त्यालाच लागून एक मोठी वसाहत निर्माण झाली आहे. ते त्या जमिनी कोणी विकल्या त्याची शहानिशा शासनाने करावी व गावामध्ये अश्या लोकांकडून भडका-भडकवी होत आहे. त्यांना वेळीच आळा घालावा. आमच्या विरुद्ध वाईट अफवा पसरवू नयेत. गावातील शेतकऱ्यांच्या विरुद्ध तक्रारी  देणारे १४ लोक कोण आहेत. हे गावातील लोकांना माहिती आहे. त्यामुळे आपल्या फायद्यासाठी गावाला वेठीस धरून ही भूमाफियांची टोळी आपली भाकरी भाजून घेत आहे. हे गावातील जनतेला माहित आहे. मला कोणावर आरोप करायचे नाहीत. परंतु माझ्यावर कोण खोटे आरोप करत असेल, तर ते सहन करायला मी कोण साधू संत नाही. मला व माझ्या कुटुंबियांना ह्या १४ जणांच्या टोळी कडून भीती आहे आणि हे काही दिवसांपूर्वी झालेल्या तलाठी कार्यालय येथील प्रकारातून स्पष्ट झालेलं आहे. त्यानुसार संबधितांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. तो गुंड प्रवृत्तीचा ग्रुप आहे. हे पूर्ण आंबोलीतील मायबाप जनता जाणत आहे. असे श्री. गणपत पाटील यांनी स्पष्ट केले.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!