भाजप-ठाकरे सेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
*🛑 भाजप-ठाकरे सेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची*
*🛑 उमेदवारांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२५*:-लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांच्या उमेदवारांविरोधात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व – बदनामीकारक मजकुरामुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुडाळ पोलीस ठाणे येथे शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला. काहीसे तणावाचे वातावरण निर्माण होईल, अशी शक्यता असताना पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वाद शांत झाला.मात्र, याबाबत पोलिसांनी अखेर दोन्ही बाजूंकडील तक्रारीची दखल घेत दोन्ही गटातील आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्या त्या दोन्ही कार्यकर्त्यांवर कारवाईची कार्यवाही सुरू केली. दरम्यान, दोन्ही बाजूंकडून आलेल्या तक्रारीनुसार आक्षेपार्ह मजकूर शेअर करणाऱ्या त्या दोन्ही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीवर ही घटना घडल्याने शहरात याबाबत चर्चा रंगली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नेत्यांविरोधात एका अल्पवयीन मुलाने व्हॉट्सअॅपवर बदनामीकारक स्टेटस ठेवला होता. त्याला संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर त्या अल्पवयीन युवकासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कार्यकर्तेही काही वेळातच पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वातावरण काहीसे तापले. कुडाळ पोलीस ठाणे येथे समोरासमोर आलेल्या या दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाल्याने वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, नंतर दोन्ही राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधातील सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराची दखल पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी केली. याबाबत एका पक्षाच्या नेत्याबाबत आक्षेपार्ह मजकूर ठेवल्याची तक्रार कार्यकर्त्याकडून पोलिसांत दाखल होत असल्याचे समजताच समोरच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपला नेता तथा उमेदवाराविरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या आक्षेपार्ह मजकुराचा विषय समोर आणत याबाबतही तक्रार घ्यावी, अशी मागणी करीत त्यांनीही तक्रार दिली. अखेर दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या त्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

