शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्याखात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती
*🛑शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्याखात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-२३*:-शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्याखात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे.
शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणिस्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांवर कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. हे चौघे कोण आहेत? यामागे नेमका कुणाचा हात आहे? याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहे.
*शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालयातील बँकेत गैरप्रकार*
शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा गैरप्रकार घडला आहे. मात्र अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याचीही काही पहिली वेळ नाही. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते. शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने अनेकांच्य भूवया उंचावल्या आहेत
आरोपीची बँकेची खाती कोलकाता येथील आहेत ,गंभीर बाब आहे. हे पहिली वेळ नसून दुसरी वेळ आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यतच पर्यटन विभागाच्य खात्यातून 67 लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन पोलिस करत आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा घटना घडत असून निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे विभागाकडे लक्ष आहे की नाही असाच सवाल या निमित्ताने उपस्थित आहे. मंत्रालयात जी बँक आहे तिथून ही रक्कम चोरीला गेली आहे. ज्या आरोपीच्या खात्यातून ही रक्कम चोरीला गेली आहे ही सर्व खाती कोलकाता येथील आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून आता तरी शासन काय करणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नाही एका महिन्यात दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मंत्रालयात प्रवेश करताना प्रत्येकाची अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. सीसीटीव्हीने सगळ्यांवर नजर असते तरीही हा प्रकार घडला आहे. चोरीची बाब निदर्शनास ही येताच त्याने चोरीची माहिती पोलिसांनी दिली.
राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नाही एका महिन्यात दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मंत्रालयात प्रवेश करताना प्रत्येकाची अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. सीसीटीव्हीने सगळ्यांवर नजर असते तरीही हा प्रकार घडला आहे. चोरीची बाब निदर्शनास ही येताच त्याने चोरीची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडे गुन्हाही दाखल केला.
काही निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शेरा, शिक्के संशयास्पद आणि बनावट असल्याचं उघड; पोलिसांत तक्रार दाखल
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

