नारायण राणेंच्या विजयासाठी एकजुटीने कामाला लागा !
*🛑नारायण राणेंच्या विजयासाठी एकजुटीने कामाला लागा !*
*🛑शिवसेनेचे नेते किरण सामंत यांचे आवाहन : झाराप येथे बैठक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२२*:-महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म पाळून एकजुटीने कामाला लागा. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घ्या, असे आवाहन सिंधुरत्न समिती सदस्य तथा शिवसेना नेते किरण सामंत यांनी झाराप येथे रविवारी झालेल्या शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.या बैठकीला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांची प्रचार यंत्रणा जोमाने राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार रणनीतीसंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिवसेना नेते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी झाराप येथील हॉटेल आराध्य येथे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख संजय आग्रे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामंत म्हणाले, राणे महायुतीचे उमेदवार असून त्यांच्या विजयासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात साथ देण्यासाठी महायुतीचा येथील खासदार केंद्रात गेला पाहिजे. त्यासाठी मेहनत घ्या, असे आवाहन त्यांनी करून काही गैरसमज असतील, तर ते बाजूला ठेवून महायुतीची ताकद दाखवून देण्यासाठी एकसंध होऊन काम करा, अशी सूचना केली.चव्हाण यांनी, महायुतीतर्फे एकत्रित प्रचार यंत्रणा राबवून उमेदवार विजयी होण्यासाठी काम करा, असे आवाहन केले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवावी, याबाबत चर्चा केली. या बैठकीला कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

