कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीय

घटनेची पायमल्ली करण्याचे काम सरकारकडून होतेय

*🛑घटनेची पायमल्ली करण्याचे काम सरकारकडून होतेय*

*🛑खासदार विनायक राऊत यांचा आरोप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवरुख, दि-२२*:-खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाचा उमेदवार जाहीर झाला. मात्र, जाहीर झालेल्या उमेदवार यांच्याविषयी मला काही बोलायचे नाही. या भाजप सरकारकडून अनेक आश्वासने दिली जात आहेत. लोकांचे जीवनमान महागाईने त्रस्त झाले आहे. घटनेची पायमल्ली करण्याचे काम या सरकारकडून होत आहे आणि हे सगळे थांबवायचे असेल तर आपल्याला विजयाचा निर्धार पक्का करावा लागेल, असे प्रतिपादन माजी खासदार विनायक राऊत यांनी ताम्हाणे येथे केले.गुरुवारी सायंकाळी संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब जिल्हा परिषद गटाचा जाहीर मेळावा ताम्हाणे येथे घेण्यात आला त्यावेळी राऊत बोलत होते. पुढे राऊत म्हणाले, या भाजपकडून अनेक आश्वासने दिली जातात. घरे देणार.. रोजगार देणार.. नुसत्या घोषणाबाजी लोकांना काय मिळते? लोकांचे जीवन महागाईने त्रस्त झाले आहेत. डाळ, तेल, गॅस, सोनं महाग झाले आहे. यामुळे जंनता त्रस्त झाली आहे. सरकारकडून घोषणांवर घोषणा दिल्या जातात लोकांच्या तोंडाला पाने पुसायचं काम या सरकारकडून केल जात आहे. हा देश अदानी अंबानीच्या घशात घातला जातोय संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यातील शेकडो एकर जमीन अदानीच्या घशात घातली जातेय सर्वसामान्य जनतेचं यांना काही पडलेलं नाही. माझ्यावरती आरोप केले जातात. मी काय केलं नाही असे, परंतु मी जी कामे केली, ती मी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहेत. मुंबई-गोवा महामार्गासाठी मी कित्येकवेळा झगडलो आहे. भांडलो आहे, बांधकामंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले, असेही नमूद केले. हा मतदारसंघ शांतताप्रिय असा आहे. त्यामुळे तुम्ही सर्व सुजाण मतदारांनी विचार करून आंम्हा आघाडीला भरघोस मतांनी विजयी कराल, याची खात्री आहे. तसा आपण विजयाचा निर्धार करूया, असे राऊत यांनी स्पष्ट केले. यापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी या गटामध्ये अनेक कोटींची कामे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे स्पष्ट केले आणि विकासाला कशाप्रकारे राऊत यांचा मोलाचा हातभार लागला, याचे विवेचनही त्यांनी केले. माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, काँग्रेसचे अशोक जाधव, संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!