आंबोली येथे गेली तीन वर्षे दोन व्यक्तींची दहशत; ग्रामस्थ कंटाळले
▪️गणपत पाटील व यशवंत सावंत यांच्याबाबत निवेदने देऊनही प्रशासनाचे मौन का; ग्रामस्थांचा सवाल
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴आंबोली,दि.३१: येथील ग्रामस्थांच्या विरुद्ध गणपत धोंडू पाटील व यशवंत गोपाळ सावंत हे मागील तीन वर्षापासून वेगवेगळ्या अर्जाद्वारे तक्रारी करीत आहेत. ते गावातील लोकांना खोट्या तक्रारी करून धमकावण्याचे प्रयत्न करीत आहेत. गणपत धोंडू पाटील यांनी शाळेसाठी च्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे व पीक पाहणी मध्ये सातबारावर आपल्या नावाची खोटी नोंद केलेली आहे. याबाबत तीन वर्षापूर्वी येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. या प्रकरणात बऱ्याच लोकांचा सहभाग होता. मागील तीन वर्षात याबाबत कोणतीही कारवाई प्रशासनाने केली नाही. परंतु त्यांनी वारंवार केलेल्या अर्जामुळे होणाऱ्या त्रासास कंटाळून येथील काही ग्रामस्थांनी उपोषणाचा अर्ज दिलेला होता. याची सुनावणी सुरू असताना ग्रामस्थांनी सर्वे नंबर ९३ मध्ये गणपत धोंडू पाटील यांनी केलेल्या अतिक्रमणाचा व पीक पाण्याचा विषय मांडलेला होता. प्रशासनाने कारवाई केल्यास या प्रकरणात आपले पितळ उघडे पडणार आहे. ही बाब लक्षात येताच गणपत धोंडू पाटील यांनी आंबोली येथील सर्व शासकीय सर्वे नंबर मधील पीक पाहण्यातली येथील ग्रामस्थांची नावे काढावीत व नोटीस द्यावी असा अर्ज मंडळ अधिकारी आंबोली यांचेकडे दिलेला आहे. ग्रामस्थांमध्ये मतभेद निर्माण व्हावे व आपल्याबरोबर स्थानिक भरडले गेल्यामुळे आपला विषय स्थगित राहील. हा त्यामागील उद्देश आहे. काल दि. ३० डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत तक्रारदार गणपत धोंडू पाटील यांनीच आपल्या वैयक्तिक तक्रारीमध्ये पूर्ण गावाला सामील करून आपापसात भांडणे लावायचा प्रकार केलेला आहे. त्यांनी दि. ७ डिसेंबर २०२० रोजी दिलेल्या अर्जातुन हे उघड झालेले आहे. आपले पितळ उघडे पडणार म्हणून आंबोलीतील सर्व ग्रामस्थांची तक्रार करणाऱ्या गणपत धोंडू पाटील व त्याला सामील असणाऱ्या काही व्यक्ती यांच्याबाबत प्रशासन एवढी निवेदने देऊनही मौन का बाळगून आहे. असा सवाल आंबोलीतील ग्रामस्थ करीत आहेत. गावातील लोकांना व प्रशासनास वेठीस धरणाऱ्या अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. अन्यथा आम्ही पुढील कायदेशीर लढाईस तयार आहोत. असेही ग्रामस्थांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

