🛑 ज्यांनी निवडणूकीला मदत केली त्या युतीच्या नेत्यांचा अनंत गीते यांनी विश्वासघात केलाच शिवाय कुणबी समाजाचाही विश्वासघात केला ; सुनिल तटकरे
🛑 रामदास कदमांची अनंत गीतेंवर घणाघाती टीका ; अनंत गीतेंचे डिपॉझिट जप्त करा
🛑 रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴मंडणगड, दि-२१:- मी नेतृत्व बदलले म्हणून माझ्यावर टिका करता पण अनंत गीते तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहात… रामदासभाई कदम, सुर्यकांत दळवी यांनी निवडणूकीला मदत केली त्यांचा विश्वासघात केलात… हेच नव्हे तर कुणबी समाजाचाही तुम्ही विश्वासघात केलात असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी मंडणगड येथील महायुतीच्या जाहीर सभेत केला.
कालबाह्य झालेल्या कायद्यात बदल होत असतात परंतु घटनेत बदल कधीच होणार नाही. पण जाणीवपूर्वक घटना बदलली जाणार आहे अशी अफवा पसरवली जात आहे त्यातून नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा डाव आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही घटना कधीच बदलली जाणार नाही असा विश्वास सुनिल तटकरे यांनी जनतेला दिला.
एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार यात शंका नाही. या सरकारच्या माध्यमातून नवनवीन कल्याणकारी योजना आणण्याचे काम करणार असल्याचे सांगतानाच केंद्रसरकारच्या माध्यमातून तुम्ही सुचवलेली प्रत्येक कामे पूर्ण करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव आंबवडे आपल्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड आहे. अशा या पावनभूमीत आपल्याला विकासकामे तुम्हाला सांगता येणार नाही इतकी करायची आहेत. त्यामुळे कोकणाचे आणि या मतदारसंघाचे नंदनवन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा शब्द सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.
*सुनिल तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणा – रामदास कदम*
या रायगड मतदारसंघातील उमेदवार सुनिल तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणायचे आहे असे आवाहन माजी मंत्री रामदास कदम यांनी मंडणगड येथे केले.
अनंत गीते यांच्या दोन लोकसभा निवडणुकीचा खर्च मी केला आहे. मात्र या उपकाराची परतफेड मला गुहागर मतदारसंघात पाडून केली. दुसर्याचा खड्डा खणण्याचे काम करणार्या अनंत गीते यांचे डिपॉझिट जप्त करा असे सांगतानाच पाठीत खंजीर खुपणारा आणि कोकणाला लागलेला हा काळा डाग धुवून टाका असे आवाहनही रामदास कदम यांनी केले.
सुनिल तटकरे तुम्ही प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आणि केंद्रात मंत्री होणार हे नक्की आहे. मात्र मंत्री झाल्यावर माझ्या रायगड जिल्हयात विकास योजना आणा असा शब्द रामदास कदम यांनी सुनिल तटकरे यांच्याकडून घेतला.
उद्योग गुजरातला गेले अशी बोंब ठोकत आहेत. पण खेडमध्ये येणारा उद्योग याच उध्दव ठाकरे यांनी थांबवला परंतु तेच काम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ४० दिवसात ७५ एकर जमीन आणि मंजुरी देत केले यामुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे असेही रामदास कदम म्हणाले.
नऊ वेळा खासदार होऊनही काही करु शकले नाही ते आता निवडणूक लढवून काय विकास करणार आहेत असा थेट सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अनंत गीते यांच्यावर आरोप करताना केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबवडे गावी जागतिक स्तरावरील स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे सरकार गतीमान पध्दतीने काम करत आहे. आचारसंहिता संपताच वक्फ बोर्डाचे कार्यालय रत्नागिरीत सुरू केले जाईल असा शब्द उदय सामंत यांनी दिला.
या मतदारसंघातील ७० टक्के मुस्लिम समाज आमच्या महायुतीसोबत आहेत असे सांगतानाच विकासकामांचा दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे सुनिल तटकरे अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनिल तटकरे यांचे कौतुक केले.
३० वर्षे अनंत गीते यांना निवडून दिले त्यात त्यांनी दोन वेळा मंत्रीपद भूषवले होते मात्र त्यांना जनतेची जाणीव नाहीय अशा शब्दात आमदार योगेश कदम यांनी अनंत गीते यांचा समाचार घेतला.
अनंत गीते फक्त जातीच्या नावाखाली मते मागत आहेत. संकटाच्या वेळी अश्रू पुसायला अनंत गीते आले नाहीत तर सुनिल तटकरे आणि मी स्वतः आलो होतो असेही योगेश कदम म्हणाले.
एमआयडीसीबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. आचारसंहिता संपल्यानंतर एमआयडीसी मंडणगड तालुक्यात आणल्याशिवाय शांत बसणार नाही असा शब्द आमदार योगेश कदम यांनी दिला.
मंडणगड तालुक्यातून दहा हजाराचे मताधिक्य देऊ आणि दापोली येथून श्रीवर्धन मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्य देऊ असेही योगेश कदम म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महायुतीचे जाहीर सभा मंडणगड शहरात मोठया उत्साहात आज पार पडली.
या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री आणि रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत, दापोली – मंडणगडचे आमदार योगेश कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, आरपीआय जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रकाश शिगवण आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

