केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी जाहीर.
*मुंबई-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुती तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तळकोकणात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात निवडणुकीचा सामना रंगणार आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागा महायुती कडून कोणाला मिळेल याबाबत गेले कित्येक दिवस प्रश्नचिन्ह होते मात्र आता चित्र स्पष्ट झाल्याने संभ्रम दूर झाला आहे.

