कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

प्रसुतीवेळी बाळ दगावल्याने नातेवाईक आक्रमक

*🛑प्रसुतीवेळी बाळ दगावल्याने नातेवाईक आक्रमक*

*🛑कुडाळच्या महिला रुग्णालयातील घटना : भूलतज्ज्ञ वेळेत उपलब्ध न झाल्याने प्रकार*

*🛑संतप्त भावना व्यक्त*

*🛑वैद्यकीय अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप*

*🛑तणावपूर्ण वातावरणामुळे पोलीसही दाखल*

*🛑महिला बाल रुग्णालयातील दुसरी घटना*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१७*:-येथील महिला-बाल रुग्णालयात गरोदर महिलेच्या प्रसुतीसाठी (शस्त्रक्रिया) भूलतज्ज्ञ वेळेत उपलब्ध न झाल्याने बाळ दगावल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. त्यामुळे त्या महिलेचे नातेवाईक आक्रमक झाले. रुग्णालयाच्या दरवाजावर लाथा मारण्याचा प्रकारही घडला. भूलतज्ज्ञ नसल्याची कल्पना दिली असती, तर अन्य ठिकाणी हलविले असते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला. आणखी तणाव निर्माण होऊ नये म्हणून कुडाळ पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले. काहीवेळाने नातेवाईक काहीसे शांत झाले.मालवण तालुक्यातील एका गावातील महिलेला प्रसुतीसाठी येथील महिला-बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नॉर्मल प्रसुती होत नव्हती. त्या महिलेला वेदना जाणवत होत्या. अखेर प्रसुती करण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी घेण्यात आला. परंतु, या रुग्णालयात एकमेव भूलतज्ज्ञ कार्यरत आहेत. भूलतज्ज्ञ उपलब्ध नव्हत्या. त्यांची वाट पाहावी लागली. यात वेळ गेला. काही वेळाने भूलतज्ज्ञ आल्या. शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, बाळ महिलेच्या पोटातच दगावले होते. सुदैवाने ती महिला सुखरुप आहे. *पोलिसांना केले पाचारण*
ही घटना समजताच त्या महिलेचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. तेथील वैद्यकीय अधीक्षक तसेच संबंधित डॉक्टरांना याबाबत जाब विचारत संतप्त भावना व्यक्त केल्या. नातेवाईक आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी पोलिसांनाही बोलाविण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!