कोकणक्राइममहाराष्ट्रवैभववाडी

कालव्याचे पाईप अचानक जळून खाक

*🛑 कालव्याचे पाईप अचानक जळून खाक*

*🛑 मांगवली येथील घटना : स्वस्तिक कंपनीची लाखो रुपयांची हानी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-१५*:-तालुक्यातील अरुणा धरणाच्या कालव्याचे एचडीपी पाईप जळून राख झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी दोन वा. च्या दरम्यान घडली. आगीचे • प्रचंड लोळ निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते.मांगवली रवळनाथ मंदिरानजीक माळरानावर लागलेल्या आगीत अरुणा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाईप जळून स्वस्तीक कन्स्ट्रक्शन कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गावात धुराचे लोळ पसरले होते. तालुक्यात सर्वत्र वणवे लागण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत. या आगीमध्ये आंबा, काजुच्या बागांचे मोठे नुकसान होत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान, रविवारी दुपारी मांगवली रवळनाथ मंदिराच्या येथील माळरानाला आग लागली. कडक ऊन व वारा यामुळे आगीचा भडका उडाला. ही आग कालव्याच्या पाईपचा साठा असलेल्या अरुणा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाईपांना लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. सर्वत्र धुराचा लोट व आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. काही क्षणांतच सर्व पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे आग विझविणे शक्य झाले नाही. वैभववाडी नगरपंचायतीच्या अग्निशमक दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र, या बंबानेही आग आटोक्यात आली नाही. या आगीत येथील संपूर्ण पाईप जळून गेले. या संदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी हर्षल यादव यांच्याशी संपर्क साधला असता घटनेचा पंचनामा केल्यानंतरच किती नुकसान झाले हे सांगण्यात येईल, असे सांगितले. घटननेची माहिती मिळताच पोलीस शैलेंद्र कांबळे व चालक फर्नांडिस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबत स्वस्तिक कंपनीचें सहाय्यक अभियंता किरण सुतार यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, हेत, मांगवली या गावात उजव्या कालव्याचे काम सुरू आहे. याकरिता’ ९०० व. १००० एमएम जाडीचे पाईप डिसेंबरमध्ये आणून ठेवले होते. लागलेल्या आगीत हे सर्व पाईप जळून गेले आहेत. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!