कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीय

महसूल, वनविभागाविरोधात लवकरच अवमान याचिका !

*🛑महसूल, वनविभागाविरोधात लवकरच अवमान याचिका !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-१५*:-सासोली येथील सामायिक जमिनीतील सहभाग धारकांना कोणतीही नोटीस न देता काही धनदांडग्यांना येथील जमिनीत महसूल प्रशासनाने अकृषिक सनद दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोडामार्ग तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी असताना देखील न्यायालयाचा आदेश डावलून बेसुमार वृक्षतोड केली. त्यामुळे महसूल व वन विभागाने उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. तसेच सामायिक क्षेत्रातील जमीन भागधारकांवर महसूल प्रशासन अन्याय करत आहे. त्यामुळे महसूल व वन विभागाच्या विरोधात वनशक्ती फाउंडेशन प्रमुख स्टॅलिन दयानंद व सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांच्या मदतीने लवकरच उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सासोली ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.परप्रांतीय लोक इतके मुजोर झाले आहेत की त्यांनी राखीव जंगलात जंगलतोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जिल्ह्यात एका स्थानिक व्यक्तीने खैरीसारखे एक झाड तोडले असत्ता तेथे लगेच तत्परता दाखवून त्या व्यक्तीस वनकोठडीत ठेवणारे वनविभागाचे अधिकारी सासोलीमध्ये मात्र या धनदांडग्यांना छोटेखानी दंड वसूल करून त्यांना पुरेपूर मदत करत आहेत. त्यामुळे महसूल व वन विभागाच्या विरुद्ध वनशक्ती फाउंडेशन प्रमुख स्टॅलिन दयानंद व सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांच्या सहकार्याने लवकरच उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती महेश ठाकुर, संदेश भुजबळ, संतोष परब, दीपक गवस, यशवंत देसाई, मनोज गवस व ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!