आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 निधीच प्राप्त न झाल्याने ठेकेदार संकटात

🛑 स्वखर्चाने शासकीय कामे करूनही मार्चअखेरीस निधीच प्राप्त नाही

🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL

✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-१०:-सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या विकासकामांना ३१ मार्चपर्यंत निधीच प्राप्त न झाल्याने आमची आर्थिक कुचंबणा झाल्याचे जिल्हयातील शासकीय ठेकेदारांचे म्हणणे आहे. त्यातच अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींकडून कधी-कधी विशेष कारण नसतानाही तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक शासकीय कामे रखडल्याचा आरोपही ठेकेदार करीत आहेत. विशेषतः रस्त्यांची पावसाळ्यापर्यंत कामे रखडल्यास ठेकेदारांचे मोठे नुकसान होणार आहे. रस्ते खराब असल्याने वाहनचालक, नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. अपघातांचीही शक्यता असतेच. तसे झाल्यास या सर्व बाबींना आम्हालाच जबाबदार ठरविले जाते, अशी खंतही ठेकेदार व्यक्त करीत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात वर्षभरात कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. यात रस्ते, ब्रिज, शासकीय इमारतींचा समावेश आहे. यातील अनेक कामे पूर्णत्वास गेली, तर काही कामे सुरूही आहेत. निधी प्राप्त नसताना आम्ही स्वखर्चाने ही कामे सुरूच ठेवली. मात्र, त्यानंतरही निधी प्राप्त न झाल्याने आमचीही आर्थिक अडचण झाल्याचे ठेकेदार सांगत आहेत.

*निधीच नसेल तर कामांना मंजुरी का?*

करोडो रुपयांच्या शासकीय कामांची घोषणा केली जाते, ठेकेदारांना कामांचा ठेका दिला जातो. मात्र, पदरचे पैसे खर्च करून काम पूर्ण केल्यानंतरही आपली बिले प्राप्त करून घेण्यासाठी ठेकेदारांना बांधकाम विभाग कार्यालयात अक्षरशः हेलपाटे मारावे लागतात. मार्च अखेरीस बिले मंजूर होण्याची ठेकेदारांना आशा होती, तीही फोल ठरली. शासनाकडे निधीच उपलब्ध ‘नसेल, तर मग कामांना मंजुरी का दिली जाते? असा सवालही ठेकेदार करत आहेत.

*हस्तक्षेपांमुळे कामे रखडल्याचा आरोप* एकीकडे शासकीय कामे जास्तीत जास्त वेगाने पूर्णत्वाकडे नेण्याचा ठेकेदारांचा प्रयत्न असतो. मात्र, ‘क्वालिटी’ व अन्य मुद्दे उपस्थित करून, बऱ्याचदा विशिष्ट उद्देशाने काही सामाजिक, राजकीय व्यक्तींकडून तक्रारी होतात. अनेकांच्या विशिष्ट हेतूंनी केलेल्या हस्तक्षेपांमुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे रखडल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. कामे अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यात त्याचा वाहनचालक, नागरिकांना त्रास होणार आहे. अपघातांची शक्यताही असते. बहुतांश विकासकामांना वेगवेगळ्या शासकीय विभागांची परवानगी घेण्याची वेळ येते. मात्र, परवानगी प्रक्रिया पूर्ण व्हायलाही महिनोन्महिने लागतात. याबाबतही शासनाने योग्य तोडगा काढणे गरजेचे असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!