वेंगुर्ल्यात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
*🛑वेंगुर्ल्यात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-०९*:-शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न. प.चे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनीष सातार्डेकर यांनी केला आहे. येथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यांचा प्रचंड त्रास वाहनचालक, पादचारी व शाळकरी मुलांना होत आहे. मोकाट कुत्र्यांचे कळप शहरात जागोजागी पाहायला मिळतात. हे कुत्रे शाळकरी मुले व पादचाऱ्यांच्या अंगावर जाऊन भुंकतात. चावाही घेतात. लहान मुलांवर कुत्र्यांच्या कळपांनी हल्ला करण्याचे प्रकार वाढत आहेत. हे कुत्रे जोरजोरात भुंकणे, रडणे, रस्त्यावर झोपणे, पादचारी, दुचाकीस्वार यांच्या मागे लागणे, चावा घेण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार होत असल्याने मोकाट कुत्र्यांचा त्रास होत आहे. अपघातही झालेले आहेत. न. प.कडे नियंत्रणाबाबत उपाययोजना नसल्याने कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी न. प.ने त्यांची नसबंदी करण्याची उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. तरच कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. वेंगुर्लेवासीयांच्या संयमाचा अंत पाहू नये. न.प.ने याकडे गांभिर्याने लक्ष ‘देऊन कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अन्यथा त्यांना वेंगुर्लेवासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्याला नगर परिषदेचे संबंधित अधिकारीच जबाबदार असतील, असा इशारा अॅड. सातार्डेकर यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

