कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

पूरग्रस्त नुकसान भरपाईसाठी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार!

*🛑पूरग्रस्त नुकसान भरपाईसाठी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-०५*:-सावंतवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही तात्काळ अदा करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नीतेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी दिली आहे. बांदा, शेर्ले, वाफोली, इन्सुली गावात २०२० व २०२१ रोजी महापूर आला होता. त्यावेळी शेकडो दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यातील बऱ्याच नुकसानग्रस्तांना अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. शासनाकडून पुन्हा नुकसानग्रस्त ग्रामस्थांची यादी मागविण्यात आली असून पुन्हा कागदपत्रे गोळा करून ती आपल्या कार्यालयाला सबमिट करण्याची सक्ती करण्यात येत आहे. मात्र, पहिल्यावेळी पंचनामा जोडण्यात आला असून स्वतः तलाठ्यांनी ही यादी बनविली होती. असे असताना पुन्हा कागदपत्रांची मागणी करणे हे नुकसानग्रस्तांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जुन्या पंचनामा यादीनुसारच तात्काळ भरपाईची रक्कम खात्यात वर्ग करण्यात यावी. काही गावातील पंचनाम्याच्या प्रति या गहाळ झाल्याने याला सर्वस्वी अधिकारी व महसूल कर्मचारी जबाबदार असल्याने पूरग्रस्तांना पुन्हा कागदपत्रे जमा करण्याची सक्ती करू नये. यासाठी पालकमंत्री चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!