एप्रिल महिना उजाडूनही धान्याचा पुरवठा नाही
*🛑एप्रिल महिना उजाडूनही धान्याचा पुरवठा नाही*
*🛑योजना चालविताना मुख्याध्यापक अडचणीत : योजनेबाबत उदासिनता*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०४*:-प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पुरविला जाणारा तांदूळ, धान्यादी मालाचा मार्च संपून एप्रिल महिना सुरू झाला, तरी अद्याप पुरवठा नाही. आता आहार शिजवून देणे शक्यच नाही. ही योजना चालविताना मुख्याध्यापक अडचणीत येत आहेत. या योजनेबाबत प्रशासन आपली उदासिनता दाखवित आहे, अशी खंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ शाखेचे अध्यक्ष शशांक आटक व सचिव महेश गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. केंद्रशासन व राज्य शासनाच्या उपयुक्त, जनकल्याण योजनेतील अत्यंत महत्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आहे. ही योजना सतत सुरू राहणे अपेक्षित आहे. यासाठी योग्यवेळी योग्य तांदूळ व धान्यादी माल पुरविणे आवश्यक आहे.शाळांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्या तसेच मुख्याध्यापक किमान पंधरा दिवस धान्यादी माल स्वतः खरेदी करून योजना सुरू ठेवू शकतात. परंतु नेहमीप्रमाणेच प्रशासन उदासिनता दाखवित आहे, असे पत्रकात म्हटले आहे.जानेवारीच्या आठ तारीखला फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंतची तांदूळ व धान्यादी मालाची मागणी शाळांनी दिली आहे. फेब्रुवारी २०२४ शेवटच्या आठवड्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचे तांदूळ व धान्यादी माल पुरविण्यात आला. आता एप्रिल महिना सुरू झाला आहे, पण पुढील धान्याचा पत्ताच नाही. न्यायालयानेही ही योजना सतत सुरू राहवी, अशा स्पष्ट सूचना दिल्या असताना प्रशासन एवढे निष्काळजी कारभार कसा करू शकते?सवालही करण्यात आला आहे.प्रत्येकवेळी मुख्याध्यापकाने अशा विविध योजनांसाठी आर्थिक जबाबदारी का घ्यावी? त्याला स्वतःचे आर्थिक प्रपंच नाहीत का? मोठ्या शाळांसाठी अशी योजना चालविणे, तर मुख्याध्यापकांना शक्यच नाही. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ शाखा ही मुख्याध्यापकांच्या सदैव पाठिशी असून कोणताही आर्थिक भार सोसणे, यासाठी मुख्याध्यापक जबाबदार राहणार नाहीत. प्रशासनालाच जर योजनेचे देणे-घेणे नसेल, तर मुख्याध्यापक कोणतीही जबाबदारी स्विकारणार नाहीत, असे स्पष्ट करून शिक्षक समिती कुडाळ शाखा अशा लोककल्याणकारी योजनेच्या विरोधात नसून योजना सतत कार्यान्वित राहण्यासाठी प्रशासनाची जबाबदारीही त्यांनी निभावणे आवश्यक असल्याची जाणीव करून देण्यासाठी आवाज उठवित असल्याचे म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

