सुट्टीतही शासकीय कार्यालये गजबजलेली
*🛑 सुट्टीतही शासकीय कार्यालये गजबजलेली*
*🛑 मार्च एन्ड, निवडणूक कामकाजामुळे कार्यालये सुरू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०१*:-२९ ते ३१ मार्च ला सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्या खऱ्या. मात्र, मार्च एन्ड व निवडणूक कामकाजामुळे सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यातही सर्व कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. मार्च एन्डच्या निधी खर्चात जिल्हा प्रशासनाने बाजी मारत जिल्हा नियोजनचा २०० कोटी रुपयांचा सर्व निधी खर्च केला आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाला मार्च एन्डं संपलेला नसून अजूनही पूर्ण निधी खर्च करता आलेला नाही.२९ मार्चला गुड फ्रायडेची सुट्टी, ३० मार्चला शनिवार व ३१ मार्चला रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या मार्च अखेरलाच आल्या होत्या. मात्र, तिन्ही दिवस सुट्ट्या असूनही मार्च एन्डमुळे सर्व शासकीय कार्यालये, बँका सुरूच होत्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीचेसुद्धा सध्या कामकाज सुरू असल्याने कार्यालये सुट्टीतही सुरू ठेवण्यात आली होती. तत्पूर्वी गेले पंधरा दिवस सर्वच विभागाची निधी खर्चाची धावपळ सुरू होती. रात्री उशिरापर्यंत कार्यालये सुरू होती. कामाची बिले काढण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये ठेकेदारांची गर्दी रोज जमत होती. जलजीवन कमिशनची कामे केलेल्या ठेकेदारांनी तर कामाची बिले होत नसल्याने आंदोलनही केले होते. त्यानंतर आता बहुतांश बिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशोर तावडे याच्या मार्गदर्शनाखाली निधी खर्चाचे नियोजन अगोदरपासूनचे केले होते व फेब्रुवारी अखेरीलाच जिल्हा नियोजनचा २०० कोटीचा निधी सर्व विभागाना वितरीत केला होता. आता निधी खर्चाचा अहवालही जिल्हा नियोजनकडे सर्व विभागाकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनचा २०० कोटीचा निधी मार्च खेरीस शंभर खर्च करण्यात यश आलेले आहे. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष २०२४-२५ सुरू होणार आहे या वर्षासाठी २५० कोटीचा जिल्हा वार्षिक विकास आराखडा मंजूर झाला असून १ एप्रिलपासून नव्या वर्षाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_