‘अरुळे’त महानेट कंपनीची जिओ फायबर केबल शेतीतून टाकू नये..
▪️शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने सरपंच उज्वल नारकर यांचे तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२९: तालुक्यातील अरुळे गावात महानेट कंपनीद्वारे टाकण्यात येणारी रिलायन्स जिओ फायबर केबल शेतकऱ्यांच्या शेतीतून टाकू नये. अशी मागणी अरुळे सरपंच उज्वल नारकर यांनी केली आहे. याबाबत तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अरुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महानेट कंपनीकडून रिलायन्स जिओच्या फायबर ऑप्टिकल केबलद्वारे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. कंपनीने केबल टाकताना गावातील मुख्य जिल्हा परिषद मार्ग न निवडता ग्रामस्थांच्या वैयक्तिक मालकीच्या शेत जमिनीतून लाईन टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात या बाबत शेत जमीन मालकांची अथवा स्थानिक प्रशासनाशी कोणतीही चर्चा केलेली नाही. असे असता केबल टाकण्यासाठी लागणाऱ्या पोलसाठी शेत जमिनीमध्ये खोदकाम सुरू केले आहे. याला स्थानिक शेत जमीन धारक शेतकऱ्यांनी यांनी हरकत घेतली आहे. तशा तक्रारी ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्या आहेत.
या जमिनीत शेतकरी जून ते ऑक्टोबर पावसाळी व नोव्हेंबर ते एप्रिल उन्हाळी शेती करीत असतात. त्यामुळे भविष्यात या महानेटद्वारे जे पोल बसविले जातील, ते वादळ सदृश्य परिस्थितीमध्ये पडण्याची व त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाची नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ही ऑप्टिकल केबल अरुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद मार्गावरून व्हावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. जिल्हा परिषद मार्गाने केबल टाकण्यास कोणताही विरोध असणार नाही. उलट या ठिकाणावरून पोल जोडणीचे काम झाल्यास ते अधिक सोयीचे ठरेल. तरी नियोजित रूट मॅपिंगमध्ये बदल करून सदरचे मॅपिंग ग्रामस्थांच्या सोयीने करून काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

