कोयत्याने मारहाण प्रकरणातून तिघांची निर्दोष मुक्तता
*🛑 कोयत्याने मारहाण प्रकरणातून तिघांची निर्दोष मुक्तता*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-३०*:-दांडी मोरेश्वरवाडी येथे कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या यशवंत सदाशिव चांदेरकर, रुपाली रवींद्र चांदेरकर, रवींद्र सदाशिव चांदेरकर यांची मालवण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महेश देवकाते यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड. उल्हास कुळकर्णी, अॅड. प्राची कुळकर्णी, अॅड. अमेय कुळकर्णी यांनी काम पाहिले.दांडी मोरेश्वरवाडी येथे १२ एप्रिल २०२१ रोजी ९.३० वाजता फिर्यादी सुंदर सदाशिव चांदेरकर यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस चांदेरकर यांच्या सामायिक जमिनीतील माड तोडण्याकरिता कामगार बोलविला होता. त्यावेळी तेथे संशयित यशवंत सदाशिव चांदेरकर हा आला. त्याने सुंदर चांदेरकर व त्यांचा कामगार यांना शिवीगाळ करून तू माड तोडायला घेतलास, तर तुझा हात-पाय तोडणार, अशी धमकी दिली. तेव्हा तिथे सुंदर यांचा भाऊ सुशांत सदाशिव चांदेरकर हा आला व त्याने मी माड तोडतो, असे सांगितले. यावेळी यशवंत सदाशिव चांदेरकर याने पुन्हा शिवीगाळ केली. नंतर तेथे यशवंत चांदेरकरची पुतणी व आई रुपाली रवींद्र चांदेरकर या तिथे आल्या व त्यांनी सुंदर चांदेरकर यांची पत्नी समीक्षा हिला मारायला सुरुवात केली. त्यावेळी सुंदर सोडविण्यास गेले असता, रवींद्र सदाशिव चांदेरकर याने सुंदर यांच्या पत्नीला थापटाने मारले. नंतर सुंदर चांदेरकर व यशवंत सदाशिव चांदेरकर, रुपाली रवींद्र चांदेरकर, रवींद्र सदाशिव चांदेरकर यांच्यात बाचाबाची व शिवीगाळ झाली. त्यावेळी रवींद्रने सुंदरच्या पत्नीला थापटाने मारले. त्या झटापटीत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाले. तेथे सुंदरची बहीण ज्योती दीपक ढोके ही सोडविण्यासाठी गेली असता, रवींद्रने तिच्या पाठीत ठोसा मारला. नंतर सुंदर यांच्या पाठीमागे येऊन रवींद्र चांदेरकरने त्याच्या खांद्याला धरून ओढले असता, रवींद्रच्या हातातील कोयता सुंदर चांदेरकरांच्या डोकीत लागला. या घटनेची फिर्याद सुंदर चांदेरकरनी मालवण पोलीस ठाण्याला दिली. या फिर्यादीनुसार संशयित यशवंत सदाशिव चांदेरकर, रुपाली रवींद्र चांदेरकर, रवींद्र सदाशिव चांदेरकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी मालवण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महेश देवकाते यांच्या समोर होऊन साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद याचा विचार करून तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_