कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

आडवलीत १० एप्रिलपासून स्वामी समर्थ जयंती उत्सव

*🛑आडवलीत १० एप्रिलपासून स्वामी समर्थ जयंती उत्सव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मसुरे, दि-३०*:-आडवली-समर्थगड येथील स्वामी समर्थ मठ येथे १० एप्रिल रोजी स्वामी समर्थ जयंती उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त १० ते १८ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. १० रोजी सकाळी ६ वा. विधीवत पूजा, ९ नंतर दर्शन सोहळा, दुपारी १२.३० वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, २ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत हळदीकुंकू समारंभ, रात्री ८ वा. महाआरती, ९ ते १२ वा. महाप्रसाद, ९ पासून भजने.११ आणि १२ एप्रिल रोजी रात्री ९ वा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी एकेरी नृत्य स्पर्धा होईल. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ९०००, ७०००, ५००० रुपये आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्यात येईल. १३, १४ रोजी रात्री ९ वा. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धा होईल. यातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १५ हजार, १२ हजार, ९ हजार रुपये आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल.१५ रोजी रात्री ९ वा. भजन अलंकार बुवा अजित गोसावी, बुवा भालचंद्र केळुसकर, बुवा कृष्णा राऊळ यांचा संगीत जुगलबंदी कार्यक्रम. १६ रोजी रात्री ९ वा. बुवा विनोद चव्हाण, संदीप पुजारे, अरुण घाडी यांच्यात तिरंगी भजन सामना होणार आहे. सामन्यात प्रेक्षकांमधून प्रश्नोत्तरे करण्यात येणार आहेत. परीक्षण बुवा भालचंद्र केळुसकर करणार आहेत. १७ रोजी रात्री ९ वा.एकेरी आणि समूह नृत्य स्पर्धांतील प्रथम पाच स्पर्धकांचा महामुकाबला स्पर्धा होईल. स्पर्धेनंतर लगेच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. १८ रोजी सांगता सोहळा होईल. सकाळी विधीवत पूजा, रात्री ८ वा. महाआरती, ९ वा. महाप्रसाद, सेवेकरी पालकांच्या मुलांसह दशक्रोशीतील मुलांसाठी एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. यावेळी जत्रोत्सव आकाश पाळणी, खेळणी, कपड्यांची दुकाने असणार आहेत. अधिक माहितीसाठी डॉ. सिद्धेश सकपाळ (९४२०८९०८१०), प्रकाश गवस, अतुल घाडीगावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वामी समर्थ चरणसेवक भाई महाराज यांनी केले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन समर्थ गड, आडवली यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!