कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वेंगुर्ल्यातील ४६ महसुली गावे डोंगरी विभागामध्ये

*🛑वेंगुर्ल्यातील ४६ महसुली गावे डोंगरी विभागामध्ये*

*🛑तब्बल ३१ वर्षानंतर मागणी पूर्ण : मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१५*:-वेंगुर्ले तालुक्याचा डोंगरी क्षेत्र उपगटामध्ये समावेश करण्यात आला असून यात तालुक्यातील ८४ पैकी ४६ महसुली गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून या डोंगरी क्षेत्र योजनेत वेंगुर्ले तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वेंगुर्ले तालुका डोंगरी विभाग म्हणून जाहीर करावा ही येथील ग्रामस्थांची गेल्या ३१ वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे.
*१९९२ मध्ये झाला होता पहिला ठराव*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील काही गावे व संपूर्ण वेंगुर्ले तालुका डोंगरी क्षेत्रामध्ये समाविष्ट नव्हता. त्यामुळे येथे डोंगरी विकास निधी मिळत नव्हता. वेंगुर्ले पंचायत समितीवर जनता दलाची राजवट असताना १९९२ मध्ये प्रथम वेंगुर्ले तालुका डोंगरी विभाग जाहीर करावा, असा ठराव पं. स. मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर या पंचायत समितीच्या सर्वच आमसभामध्येही हा ठराव सर्वच पक्षांच्यावतीने कित्येक वर्षे करण्यात येत होता. याच एका विषयावरुन त्यावेळच्या आमसभा वादळी होत होत्या. जनता दलाचे आमदार पुष्पसेन सावंत, शिवसेनेचे आमदार शंकर कांबळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वच आमसभांमध्ये वेंगुर्ले तालुका डोंगरी विभाग व्हावा, म्हणून ठराव करण्यात आले होते.
*आता मिळणार डोंगरी विकास निधी आता शालेय शिक्षणमंत्री दीपक* केसरकर यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व पालकमंत्री रवीद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील एकूण ८४ महसुली गावांपैकी ४६ गावांचा डोंगरी विभागामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे या गावातील लोकांना डोंगरी विकास निधी मिळणार आहे. व या डोंगरी विकास निधीतून रस्ते, शाळा, अंगणवाडी, नळपाणी योजना आदी विकास कामे करता येणार आहेत.
*तालुक्यातील ४६ महसुली गावांचा समावेश*
डोंगरी उपगट वेंगुर्ले तालुक्यात परुळे, म्हारतळे, कर्ली, पेंडुर, गावतळे, चिपी, केळुस सखेलेखोल, तळेकरवाडी, मातोंड, होडावडा, पिंपळगांव, गवाण, म्हापण, रावदस, सातवायंगणी, सोन्सुरे, वायंगणी, टांक, वडखोल, खालचीवाडी, न्हैयचीआड, जोसोली, खवणे, वेंगुर्ले शहर, वरचेमाड, कनयाळ, मेढा, खानोली, पाल, अणसूर, शेळपी, मठ सतये, वेतोरे, मायने, श्रीरामवाडी, आसोली, कोचरे, कालवी, मोचेमाड, मूठ, तुळस, भोगवे, पलतड, दाभोली, वेतोरे-वरचीवाडी, मठ या महसूल गावांचा समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन नियोजन विभागाकडून १३ मार्च २०२४ रोजी जाहीर झाल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!