शहीद जवानांच्या कुटुंबांना दळवी फाऊंडेशनची साथ
*🛑शहीद जवानांच्या कुटुंबांना दळवी फाऊंडेशनची साथ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२*:-देशासाठी शहीद व जायबंदी झालेल्या कुटुंबांची स्वप्ने त्यांच्या कुटुंबाचे घटक समजून पूर्ण करण्याचा संकल्प ‘विनायक दळवी चॅरिटेबल फाऊंडेशन’ने केला आहे. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ट्रस्टकडून लाखमोलाची साथ मिळणार आहे. सैन्यदलातील जवानांबरोबर लग्नगाठ बांधताना नवविवाहिता अनेक स्वप्न उराशी बाळगून असते. लग्नाला काही दिवस होत नाहीत तोच जवानाला सीमेवर देश रक्षणासाठी हजर रहावे लागते. गेल्या काही वर्षर्मिध्ये सीमेवरील घुसखोरी, अतिरेकी हल्ले यांचा सामना करताना अनेक तरुण जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. शहीद झालेल्या अशा सैनिकांची आपल्या कुटुंबाप्रतीची स्वप्ने अपूर्ण राहतात. ही स्वप्ने काही अंशी पूर्ण करण्याचा संकल्प दळवी चॅरिटेबल फाऊंडेशनने केला आहे. स्वरमानस या संस्थेतर्फे नुकतेच शिवाजी पार्क येथे एका गाण्याच्या कार्यक्रमाचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला ‘लाख’मोलाचा निधी मानसी केळकर यांनी विनायक दळवी चॅरिटेबल फाऊंडेशनकडे सुपूर्द केला. या निधीद्वारे अशा कुटुंबियांची एखादी इच्छा पूर्ण करण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. याबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात अर्जाचे नमुने व माहिती १३ फेब्रुवारीच्या पत्राद्वारे मेल केली असून १५ मार्च अंतिम तारीख होती. foundarion.org office@dalvie- या इमेल आयडीवर आपला अर्ज विहित नमुन्यात पोहोचणे अपेक्षित आहे. ते शक्य न झाल्यास कुटुंबाचे ९८२०७५७२७४ या व्हाट्सअॅप नंबरवर शंकानिरसन केले जाईल, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष विनायक दळवी यांनी कळविले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

