कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिक

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने

*🛑तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने*

*🛑बंद घाट मार्गाचा वैभववाडी,तळेरे बाजारपेठेला फटका : घाटमार्गाचे केवळ १२ टक्केच काम पूर्ण : ठेकेदाराबाबत नाराजी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-१२*:-तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. या महामार्गाच्या कामासाठी करुळ घाट मार्ग जिल्हा प्रशासनाने बंद करून ठेवला आहे. हा घाट मार्ग बंद असल्याने वैभववाडी, तळेरे व अन्य बाजारपेठेतील व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या घाट मार्गाचे केवळ दहा ते बारा टक्केच काम पूर्ण झाले आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाची गती पाहता पुढील सहा महिने या मार्गाचे काम पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे. या मार्गाचे काम मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी करतानाच वेळीच या मार्गाचे काम पूर्ण न केल्यास आंदोलन उभारले जाईल, असा इशारा जिल्हा व्यापारी संघटनेकडून देण्यात आला आहे.कामाचा २७ ऑक्टोबर रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. हे काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना मुळातच ठेकेदाराने तीन महिन्यानंतर काम सुरू केले आहे. हे काम करण्यासाठी करुळ घाट मार्ग ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आला आहे. ठेकेदाराच्या कामाची गती पाहता काम पूर्ण व्हायला बराच अवधी जाणार आहे. करुळ घाट मार्ग बंद असल्यामुळे त्याचा व्यापारी वर्गाला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होण्याच्यादृष्टीने जिल्हा व्यापारी संघटनेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता अतुल शिवनिवार यांच्याशी बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील चर्चेनंतर जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अभियंता शिवनिवार यांच्यासह घाट मार्गाची पाहणी केली. या पाहणी करून घाट मार्गाचे सद्यस्थितीत केवळ दहा ते बारा टक्केच काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!