ट्रकची दोन उभ्या दुचाकींना धडक
*🛑ट्रकची दोन उभ्या दुचाकींना धडक*
*🛑तरुण जखमी : धामापूर येथील घटना : पळून जाणारा ट्रक काळसे येथे पकडला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴चौके, दि-०८*:-चिरे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने धामापूर येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या अपघातांत दुचाकी अंगावर पडल्याने वायरी-मालवण येथील कुंदन सहदेव हुर्णेकर हा तरुण जखमी झाला. तर एकजण सुदैवाने बचावला.काही तरुणांनी पाठलाग करून हा ट्रक पकडला. मात्र, चालक पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत होते. भरधाव वेगातील चिरे वाहतूक करणारा ट्रक (केए २२ सी ८३३४) हा चौके येथून कर्नाटकला चिरे भरणा करून जात होता. धामापूर भगवती मंदिरसमोरील वळणावर काही तरुण आपल्या दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभ्या करून मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यातील कुंदन हुर्णेकर हा आपल्या दुचाकीजवळ येत असता चौके येथून येणाऱ्या ट्रकने तेथील एका दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी कुंदनच्या अंगावर पडून तो रस्त्याच्या खाली फेकला गेला. त्याचवेळी ट्रकने कुंदनच्या बुलेटला धडक दिली. बुलेट रस्त्याच्या खाली जाऊन पडली. तर याच ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या सिमेंट बेंचलाही ट्रकने धडक दिल्याने त्याचे तुकडे तुकडे झाले. त्या बेंचवर एक सेंटिंग कामगार बसला होता. तो काही मिनिटांपूर्वी उठून निघून गेल्याने सुदैवाने बचावला. अपघातानंतर ट्रक काळसे-कुडाळच्या दिशेने भरधाव वेगाने निघून जात होता. कुंदन तसेच तेथील काही युवकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. काळसे येथे काही अंतरावर एका वळणावर रस्त्याच्या बाजूला ट्रक मातीच्या चरात जाऊन अडकला. त्याचवेळी चालकाने तेथून पळ काढला.ताच मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त दुचाकींचा पंचनामा करण्यात आला. तसेच टक चालकाचा शोध घेण्यात येत होता. काळसे-धामापूर या टप्यात ‘सातत्याने अपघात होत असतात. धामापूर येथील भगवती मंदिर समोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर घालावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फेही करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

