🛑 स्पर्धा परिक्षा देणार्या मुलांची संख्या वाढविण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे ; युवराज लखमराजे भोसले
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-०७ :- आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परिक्षा देणार्या मुलांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. येणार्या काळात मी मुंबई विद्यापीठाचा सिनेट मेंबर म्हणून सिंधुदुर्गात कौन्सिलिंग सेंटर सुुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोंसले यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.
सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकारी होवून यश संपादन करणार्या पियुषा वारंग, नागेश दळवी, दिनेश पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस सायबर विभागाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित गोते, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सिंधुदुर्ग जिल्हा डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, व्याख्याते रुपेश पाटील, महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणकर आदी उपस्थित होते.
कुठेच नाही इतके कोकणातील मुलांमध्ये “टॅलेंट” आहे. त्यांना फक्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि हे कौतुकास्पद काम सावंतवाडीच्या महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून सुरू आहे. याचा आम्हाला अभिमान आहे, असे मत शरद पवार गट राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सौ. अर्चना घारे यांनी आज येथे व्यक्त केले. आपल्याला कॉलेज जीवनात जिल्हाधिकारी व्हायचे होते. परंतु त्यानंतर लग्न झाल्यामुळे माझी इच्छा अपुर्ण राहिली. मात्र त्यानंतर मी राजकारणात येवून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी होवून सामाजिक काम करण्याचा अनुभव वेगळा आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सौ. घारे म्हणाल्या, कोकणातील मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे. मात्र दहावी, बारावी नंतर ते दिसत नाही. संबंधित मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे महेंद्रा अकॅडमी सारख्या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही निश्चितच करू.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार म्हणाले, या ठिकाणी येणारे अधिकारी हे उत्तर प्रदेश, बिहार येथील असतात. मग आम्ही नेमके कोठे कमी पडतो, याचा अभ्यास होण्यासाठी तेथील विद्यापीठात येथील विद्यार्थ्यांनी जावून अभ्यास करावा.
श्री. अमोल टेंबकर म्हणाले, स्पर्धा परिक्षांसाठी मुले जात नाहीत अशी ओरड केली जाते. परंतु त्या मागचे नेमके कारण काय, अशा प्रकारचे शिक्षण देणार्या संस्था जगविण्यासाठी काय करता येईल यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी व्यक्त केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

