मुंबई गोवा महामार्गावर ओरोस खर्येवाडी येथे गोवा बनावटीचा 38 लाख 43 हजाराचा मध्यसाठा जप्त
*🛑मुंबई गोवा महामार्गावर ओरोस खर्येवाडी येथे गोवा बनावटीचा 38 लाख 43 हजाराचा मध्यसाठा जप्त*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०५*:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूला रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी पाऊल उचलले आहे. सोमवारी सकाळी ओरोस खर्ये वाडी येथे मुंबई गोवा महामार्गावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे लावलेल्या सापळ्यात तब्बल 38 लाख 43 हजार 600 रुपयांचा ८२८ बॉक्समध्ये भरलेला गोवा बनावटीचा मध्ये साठा पकडला. सिंधुदुर्गातील MH 07 AJ 6059 या आयशर कॅन्टर मधून गोव्यातून कणकवलीच्या दिशेने गोवा बनावटीचे बेकायदेशीर मद्य राजरोज वाहतूक होत असताना पकडले गेले. याप्रकरणी आयशर चालक विनायक मेघनाथ नेरुरकर राहणार नेरूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून बेकायदेशीर दारू धंद्यावर वचक ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व आपण पोलीस अधीक्षक ऋषिकेश रवाळे यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला सक्रिय केले आहे. तैनात करण्यात आले आहे. गुन्हा अन्वेषण शाखेचे जिल्हा पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. त्यामुळे बेकायदेशीर दारू धंद्यांचे धाबे दणाणले आहेत. गोव्यातून कणकवलीच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष पोलीस पथकाने ही धडक कारवाई केली यामध्ये 38 लाख 43 हजार 600 रुपये किमतीचे गोवा बनावटीचे बेकायदेशीर विदेशी मद्य व 15 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा 53 लाख 43 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी हस्तगत केला आहे. व आयशर चालक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, रामचंद्र शेळके, लक्ष्मण साळुंखे प्रकाश कदम अनुप कुमार खंडे बस्त्यावर डिसूजा अमित तेली चंद्रकांत पालकर जयेश सरमळकर चंद्रहास नार्वेकर जयवंत आरमारकर आदींचा या पोलीस पथकात समावेश होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

