चेक बाऊन्सप्रकरणी कारावासासह दंडाची शिक्षा
*🛑चेक बाऊन्सप्रकरणी कारावासासह दंडाची शिक्षा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०२*:-कणकवली मैत्रीपूर्ण संबंधांमुळे कळसुली येथील महेंद्र शांताराम तांबे यांचा विश्वास संपादन करून कौटुंबिक गरजेकरीता ३ लाख रुपये हातउसने घेतले. ही रक्कम परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील सुनील कमलाकर तांबे (सध्या मुंबई) याला येथील सह प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी दोषी ठरवून सहा महिने कारावास व धनादेशाच्या रकमेएवढा तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. फिर्यादी महेंद्र तांबे यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेत, सुनील तांबे याने महेंद्र तांबे यांच्याकडून मे २०१५ मध्ये तीन लाख रुपये दोन हप्त्यामध्ये हातउसने सहा महिन्यांकरीता घेतले होते. सदरची रक्कम ठरलेल्या कालावधीत परतफेड न करता फिर्यादीच्या मागणीवरून आरोपीने त्याला अभ्युदय को. ऑप. बँकेचा वडाळा शाखचा धनादेश दिला होता. मात्र, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटला नव्हता. म्हणून फिर्यादीने वकिलांमार्फत नोटीस पाठवून त्याच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्मेंट कायद्याखाली खासगी फिर्याद दाखल केली होती.सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला सहा महिन्यांचा कारावास वं धनादेशाच्या रकमेएवढा तीन लाखांचा दंड व चेक दिल्याच्या तारखेपासून ९ टक्के व्याज दोन महिन्यांत अदा करण्याचे आदेश दिले. तसेच दंड व व्याज अदा न केल्यास आणखी सहा महिने न कारावासाची शिक्षा ठोठावली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

