कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोतवाल संघटनेकडून नाईक कुटुंबीयांना मदतीचा हात

 

प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर

सावंतवाडी – काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे येथील कोतवाल सहकारी कै. संतोष राजाराम नाईक यांनी अनधिकृत माती उत्खनन प्रक्रियेत सहभाग घेतल्यामुळे टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली होती.त्यांच्या अचानक जाण्याने नाईक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या तालुका कोतवाल संघटना सावंतवाडी, तहसीलदार साहेब व कर्मचारी, तलाठी कर्मचारी यांच्या कडून त्यांचे सहकारी कोतवाल कै. संतोष नाईक यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी सावंतवाडी तालुका कोतवाल संघटना अद्यक्ष लियाकत बेग, सदस्य अर्चना दळवी, नरेंद्र नाईक, उल्हास पार्सेकर आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!