वेंगुर्ला येथे घडलेल्या दिशा चौकेकर मृत्यूची सखोल चौकशी करा…….. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
वेंगुर्ला येथे घडलेल्या दिशा चौकेकर मृत्यूची सखोल चौकशी करा…….. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सावंतवाडी
वेंगुर्ला येथील दिशा चौकेकर मृत्यू प्रकरणी बरेच दिवस उलटून गेले तरी तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास काम झाले नाही, त्यामुळे सदर तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन तो सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
मूळ सावंतवाडी येथील संगीता पेडणेकर व लग्नानंतरची दिशा चौकेकर हिचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता व घटनास्थळावरील माहिती घेतली असता तो घातपातच असल्याचा बोलले जात होते,मात्र पोलीस कोणत्या दिशेने तपास करतात हे पाहण्यासाठी आम्ही शांत होतो, मात्र पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे हा तपास पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी काढून घेऊन तो सीआयडी कडे द्यावा व खरा गुन्हेगार शोधून काढावा अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे
दिशा चौकेकर या पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी होत्या, त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर तो का घेतला, घटनास्थळावरील पुरावा हा आत्महत्या नसल्याचे सुकृत दर्शनी दिसून येत असताना पोलिसांनी त्या दृष्टीने तपास का केला नाही, नातेवाईकांनी लेखी तक्रार नोंदवूनही पंधरा दिवस उलटले तरी पोलीस तपास शून्य आहे ,त्यामुळे स्थानिक पोलीस हा तपास करू शकत नाहीत म्हणून तो काढून घेऊन सीआयडी कडे द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक भवन साळवेकर यांनी केली आहे.

